• Download App
    1 मे संभाजीनगरात राजसभेच्या दिवशीच मुंबईत फडणवीस "बूस्टर डोस" सभा!!Fadnavis in Mumbai on the day of Rajya Sabha in Sambhajinagar on 1st May

    सभांचा धडाका : 1 मे संभाजीनगरात राजसभेच्या दिवशीच मुंबईत फडणवीस “बूस्टर डोस” सभा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असले तरी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे. कारण आता एका पाठोपाठ एक सभांचा धडाका सुरू होताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे ते महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी संभाजीनगर मध्ये सभा घेणार आहेत, तर त्यांच्या आधी 30 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची पुण्यात लोकमान्य टिळक चौक अलका टॉकीजपाशी जाहीर सभा होणार आहे, तर भाजपा देखील आता सभा घेण्याच्या दृष्टीने मागे राहिला नसून राज ठाकरे यांच्या संभाजीनगर मधल्या सभेच्या दिवशीच 1 मे महाराष्ट्र दिनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा घेणार आहे.Fadnavis in Mumbai on the day of Rajya Sabha in Sambhajinagar on 1st May

    1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या औचित्य साधत भाजप मुंबईतील सोमय्या मैदानावर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यानंतर फडणवीसांचे बूस्टर डोस भाषण अशी सभा घेणार आहे. भाजपच्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांसाठी बूस्टर डोस बूस्टर आणि महाविकासआघाडी तल्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या घटक पक्षांसाठी डोस अशी सभा असेल, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

    गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या सभा गाजत आहेत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना 14 तारखेला बीकेसी मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा घेणार आहेत. त्यापूर्वी 30 एप्रिल रोजी पुण्यात लोकमान्य टिळक चौक अलका टॉकीजपाशी महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने देखील कोठेही मागे नसल्याचे दाखवून देत 1 मे रोजी बूस्टर डोस सभा आयोजित केली आहे. यामध्ये भाजपचे बुथ वरचे सर्व पन्ना प्रमुख आणि अन्य लाखो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

    याचा अर्थ उघड आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जरी अस्तित्वात असले आणि ते मजबूत असल्याचा निर्वाळा शरद पवार आणि उद्धव ठाकरे देत असले तरी महाराष्ट्राची राजकीय वाटचाल ही निवडणुकीच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

    Fadnavis in Mumbai on the day of Rajya Sabha in Sambhajinagar on 1st May

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस