प्रतिनिधी
मुंबई : मेट्रो कारशेड प्रकल्प आरेतून कांजूर मार्गला हलवता येणार नाही, असा अहवाल ठाकरे सरकारने नेमलेल्या सौनक समितीनेच दिला होता. पण तरीही उद्धव ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतला. यामागे त्यांचा इगो होता, त्यांचा निर्णय मुंबईकरांच्या हितासाठी घेतला गेला नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.Fadnavis criticizes Thackeray on Metro carshed It was Mavia’s committee that gave the report against Kanjur, Thackeray’s ego behind moving the project
फडणवीस म्हणाले की, पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो, पण मुंबईच्या हितासाठी आम्ही मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला आहे. लोकलमुळे अपघात होतात अशा प्रवाशांसाठी आमची लाइफलाइन म्हणजे मेट्रो प्रकल्प आहे. आमच्या सराकारने आरेमध्ये मेट्रो कारशेड प्रकल्प हाती घेतला. त्यामुळे मविआ उच्च न्यायालयात व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले.
जी झाडे कापली ती तेथे पूर्ण जीवनकाळात जेवढा कार्बन उत्सर्जित करेल तेवढा कार्बन मेट्रो ८० दिवसांत करणार आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी व्हावे, हे आमचे धोरण आहे. आम्ही काम सुरू केले तेव्हा आंदोलन झाले नाही, पण २५ टक्के काम झाल्यानंतर विरोध सुरू झाला.
फडणवीस म्हणाले, आदित्य ठाकरे जरूर पर्यावरण मंत्री होते; पण त्यांनीच सर्व अभ्यास केला असा त्याचा अर्थ होत नाही.
Fadnavis criticizes Thackeray on Metro carshed It was Mavia’s committee that gave the report against Kanjur, Thackeray’s ego behind moving the project
महत्वाच्या बातम्या
- द्रौपदी मुर्मू : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी महिला राष्ट्रपतीपदी; 5.77 लाख मतांनी विजय; यशवंत सिन्हांना केवळ 2.61 लाख मते
- ईडी कारवाई : इक्बाल मिर्चीशी मनी लॉन्ड्रींग; प्रफुल्ल पटेलांचे सीजे हाऊस मधील चार मजली घर जप्त!!
- महाराष्ट्रात उत्सवी धमाका : पंढरीच्या मुक्त वारीनंतर आता दहीहंडी आणि गणेशोत्सवही निर्बंधमुक्त!!
- UK PM Race : अंतिम टप्प्यात पोहोचण्यात यशस्वी ठरले ऋषी सुनक, आता लिझ ट्रस यांच्याशी होणार लाइव्ह डिबेट