विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचा महा कत्तलखाना असा खळबळजनक आरोप करत पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत आघाडी सरकारवर जो पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला आहे, त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले असून फडणवीसांच्या या गंभीर आरोपांवर ठाकरे – पवार सरकार मधील गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज विधानसभेत उत्तर देणे अपेक्षित आहे. Fadanavis Pendrive Bomb: What was cooked at Pawar’s house in yesterday’s meeting … ??; What will Valse Patil answer today … ??
देवेंद्र फडणवीस यांनी काल सायंकाळी विधानसभेत महाविकास आघाडी सरकार मधल्या मंत्र्यांवर आणि सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर पुराव्यांसह जोरदार आरोप केले. 125 तासांचा व्हिडिओ आणि ऑडिओ असा डेटा असलेले पेन ड्राईव्ह त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे चौकशीच्या हेतूने सोपवले. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे घर गाठले. त्यांच्याशी फडणवीसांच्या पेन ड्राइव मध्ये असलेल्या मटेरियल बद्दल चर्चा केली. शरद पवार यांच्या घरी झालेल्या या बैठकीत नेमके काय शिजले…?? दिलीप वळसे-पाटील फडणवीस यांच्या आरोपावर नेमके काय उत्तर देणार…??, याची उत्सुकता लागली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांना 100% संपवायचे आहे, असे मोठे साहेब म्हणतात असे उल्लेख सरकारी वकिलाच्या तोंडी असल्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ मध्ये आहेत.
- आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचे नाही का? देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर अनिल गोटे यांचा सवाल
शरद पवारांशी संबंधित अनेक उल्लेख या संभाषणातून आल्यामुळे राज्यातच नव्हे, तर देशाच्या वर राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे. अशा स्थितीत शरद पवार यांच्याकडे काल दिलीप वळसे पाटील यांची बैठक झाली. त्या बैठकीत त्यांचे काय शिजले…?? फडणवीसांचा आरोपांवर महाविकास आघाडी सरकारची भूमिका काय असू शकेल…?? महाविकास आघाडी बॅकफूटवर जाणार की फ्रंट फूट वर खेळणार, अशा स्वरूपाचे प्रश्न तयार झाले आहेत. शिवाय आज दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग करणारे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा विधानभवनावर जोरदार मोर्चा येणार आहे. या पार्श्वभूमीवर देखील पवारांच्या घरच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?, दिलीप वळसे पाटील या मुद्द्यावरील काय उत्तर देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
फडणवीसांचा हल्लाबोल!!
सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे ठाकरे – पवार सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र भाजपातील प्रमुख नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचे आणि त्यांना अटक करायचे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुंगटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, चंद्रकांत बावनकुळे यांना टार्गेट करायचे, अशा प्रकारचे टूलकीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी विधानसभेत उघड केले. या संदर्भातले 104 तासांचे संभाषणाचे रेकॉर्डिंग असलेले एक पेन ड्राईव्ह त्यांनी विधानसभा अध्यक्षांना अध्यक्षांकडे सोपविले या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी फडणवीस यांनी केली अन्यथा हायकोर्टात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सीबीआय चौकशी करावी
2021मध्ये गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केला. 2018मध्ये मराठा शिक्षण मंडळाच्या एका गटात संघर्ष आहे. पाटील गट आणि भोईटे गटात हा संघर्ष आहे. महाजनांचे स्वीय सहाय्यकाने अपहरण केल्याची बनावट केस केली. त्या केसमध्ये महाजनांना मोक्का लागला पाहिजे, असे सांगून मोका लावण्याचे कागदपत्रे तयार झाली. यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे ज्यांच्या ज्यांच्या सोबत बोलणे करत होते, त्या वेळीचे व्हिडिओ रेकॉर्डींगसह पुरावे फडणवीस यांनी सभागृहात मांडले, ते सर्व पुरावे विधानसभा अध्यक्षांनाही दिले. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. जर या मागणीची पूर्तता झाली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही दिला.
गिरीश महाजनांना मोक्काखाली अडकवण्याचा कट
भाजपाचे नेते गिरीश महाजन यांना मोक्का कायद्याखाली अडकवण्याचा कट रचण्यात आला होता. त्यासाठी त्यांना ड्रग्जच्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी रक्त लागलेला चाकू त्यांच्याकडे ठेवण्याचेही ठरवण्यात येत होते, यासाठी खोटे पंचनामे, खोटे पुरावे, खोटे पंच, खोटा एफआयआर हे सर्व करण्याचे कारस्थान त्या सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी रचले होते, असे फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आरोप
या कारस्थानात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांना संपवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, एकनाथ खडसे या सर्वांचा यात समावेश होता, असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.
Fadanavis Pendrive Bomb: What was cooked at Pawar’s house in yesterday’s meeting … ??; What will Valse Patil answer today … ??
महत्त्वाच्या बातम्या
- अल्पवयीन मुलींच्या बलात्कारासाठी पॉर्न कंटेंट जबाबदार ; राजस्थानी मंत्र्याचा दावा
- ‘आयटी’ छाप्याविषयी खरमाटेंना आधीच कुणकुण? छाप्यात ठाकरे, परबांचे विश्वासू लोक
- आपत्ती व्यवस्थापन कायद्यात मास्क सक्तीची तरतूद नाही? दंड आकारणी बेकायदेशीर; हायकोर्ट जनहित याचिकेचा निष्कर्ष
- ऑस्ट्रेलियात पुराचा कहर ;दशकातील सर्वात भीषण पूर असल्याचा दावा; २१ जण दगावले