• Download App
    गायब" सरकारी वकील प्रवीण चव्हाण 4 दिवसांनी एबीपी माझा समोर "प्रकट"; रेकॉर्डिंग मॅनिप्युलेशनचा केला दावा!!Fadanavis pendrive Bomb pravin chavan 

    Fadanavis pendrive Bomb : “गायब” सरकारी वकील प्रवीण चव्हाण 4 दिवसांनी एबीपी माझा समोर “प्रकट”; रेकॉर्डिंग मॅनिप्युलेशनचा केला दावा!!

    प्रतिनिधी

    पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भर विधानसभेत मंगळवारी 8 मार्च रोजी “पेन ड्राईव्ह बॉम्ब” फोडल्यानंतर त्याच रात्री केवळ एक प्रतिक्रिया देऊन “गायब” झालेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण आज चार दिवसांनंतर हे एबीपी माझा समोर “प्रकट” झाले आणि त्यांनी संबंधित स्टिंग ऑपरेशन एका आरोपीने केल्याचा तसेच त्या स्टिंग ऑपरेशन मधले रेकॉर्डिंग मॅनिप्युलेटेड असल्याचा दावा केला आहे. Fadanavis pendrive Bomb pravin chavan

    सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे गिरीश महाजन यांना बनावट गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी 8 मार्च रोजी केला होता. आता त्यावर आज शनिवारी 12 मार्च रोजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी एबीपी माझा समोर एक्स्लूझिव्हली त्यांची बाजू मांडली आहे.

    गिरीश महाजनांवर ज्या प्रकरणात गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेले व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत समोर आणले. प्रवीण चव्हाण हे गिरीश महाजन यांना बनावट गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली होती. संबंधित “बॉम्ब” फोडून देवेंद्र फडणवीस आहे गोव्याला निघून गेले होते. परवा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्यात भाजपने प्रचंड विजय मिळवला त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. काल अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे बजेट मांडले.

    त्यानंतर “अचानक” राजकीय हालचाली वाढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या वर्षा निवासस्थानी “अत्यंत महत्त्वाची” बैठक झाली. महाविकास आघाडीचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घ्यायला पोचले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट घेतली काल रात्रीच्या या “महत्त्वाच्या वेगवान” घडामोडीनंतर आज सकाळी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे “प्रकट” झाले आणि त्यांनी आपली बाजू एबीपी माझा समोर मांडली आहे.

    – स्टिंग ऑपरेशनमध्ये जळगाव कनेक्शन; प्रवीण चव्हाणांचा दावा

    देवेंद्र फडणवीसांनी पुढे आणलेल्या व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे. मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला होता. त्याने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होते आहे, असा दावाही प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.

    – भिंतीवरच्या घड्याळातील छुप्या कॅमेरातून शूट

    गिरीश महाजन प्रकरणात पुरावे आहेत म्हणून कारवाई होते आहे. माझे रेकॉर्डिंग मॅनिप्युलेट करुन वापरण्यात आले आहे. व्हिडीओ आणि ऑडिओ वेगळे आहेत. वाक्ये अर्धवट वापरण्यात आली आहेत. माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला होता, असा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.

    – प्रकरणाच्या चौकशीची मागणी

    तेजस मोरे हा तुरुंगात होता आणि जामिन मिळवण्यासाठी आपल्याकडे येत होता. तेजस मोरे हा मूळचा जळगावचा आहे आणि जळगावमधूनच हे सर्व करण्यात आले आहे. तेजस मोरेला अनेकांची साथ आहे. मी चालवत असलेल्या केसेसमधे जे आरोपी तुरुंगात आहेत. त्यांचीही त्याला साथ आहे. मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखील प्रवीण चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

    Fadanavis pendrive Bomb pravin chavan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस