• Download App
    Fadanavis Pendrive Bomb : पोलीस अधिकारी इसाक बागवान - बारामती - दाऊद कनेक्शन; फडणवीसांनी फोडला तिसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब!!|Fadanavis Pendrive Bomb: Police Officer Isaac Bagwan - Baramati - Dawood Connection; Fadnavis detonates third pen drive bomb

    Fadanavis Pendrive Bomb : पोलीस अधिकारी इसाक बागवान – बारामती – दाऊद कनेक्शन; फडणवीसांनी फोडला तिसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब!!

    प्रतिनिधी

    मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात साखळी पेन ड्राइव्ह बॉम्बस्फोटांची मालिका थांबायलाच तयार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दोन पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडले. पहिला बॉम्ब मुंबईतील कोविड घोटाळ्याचा होता, तर दुसरा बॉम्ब निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान बारामती आणि दाऊद यांच्या कनेक्शनचा होता.Fadanavis Pendrive Bomb: Police Officer Isaac Bagwan – Baramati – Dawood Connection; Fadnavis detonates third pen drive bomb

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त एन्काऊंटर स्पेशलिस्ट एसीपी इसाक बागवान यांच्या बंधूंनी त्यांच्याविरोधात एक तक्रार केलेली आहे. त्याचे बारामती कनेक्शन आहे. दादा तुमच्याशी कनेक्शन नाहीये पण बारामती कनेक्शन आहे. सेवेत असताना त्यांनी बारामतीत त्यांनी मोठी मालमत्ता जमा केली. केवळ बारामतीत 42 एकर एनए जमीन खरेदी केली. आपल्याला माहिती आहे की, बारामतीत जागेचे भाव किती आहेत. अजित पवारांचीही इतकी जागा नसेल, त्यांची शेतजमीन असेल, पण बिगरशेती जमीन नसेल.



    मुंबई ते बारामती कनेक्शन

    मुंबई पासून बारामती पर्यंत सर्व मालमत्तेची बारामीतपासून सर्व माहिती आहे. इसाक बागवान यांनी आपले सख्खे भाऊ नसीर बागवान, वडील इब्राहिम माणिक बागवान आणि चुलत भावजय यांच्या नावावर मालमत्ता खरेदी केली. नोकरीतून निवृत्ती झाल्यावर त्यांनी केवळ एक अर्ज देऊन सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली. इसाक बागवान यांनी कपूर नावाच्या व्यक्तीला ही जमीन विकली आणि तिच जमीन अवघ्या 2 महिन्यांत पुन्हा खरेदी केली.

     फरीद मोहम्मद अली – दाऊद कनेक्शन

    देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, या व्यवहारात फरीद मोहम्मद अली बिल्डरच्या नावाने जमीन विकत घेतली होती. हा कोण आहे तर…2017 मध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे क्राईम ब्राँचने अटक केली होती त्यावेळी त्याने सांगितले होते की, फरीद मोहम्मद अली याला मी 10 लाख रुपये दिले होते. फरीद मोहम्मद अली याची चौकशी झाल्यानंतर सात दिवसांत त्याचा मृत्यू झाला.

    फरीदची जमीन इसाक बागवानांना बक्षीस

    41 लाख रुपयांना हीच संपत्ती फरीद मोहम्मद याने विकत घेतली. ही सर्व संपत्ती 10 वर्षे नावावर ठेवली आणि त्यानंतर 30 डिसेंबर 2020 ला फरीद मोहम्मदच्या मुलाने इसाक बागवान यांना बक्षीस पत्र म्हणून दिली. यासंदर्भातील पेन ड्राईव्ह आपल्याला देण्याचे कारण आहे की एका राजकीय व्यक्तीने यात मध्यस्थी केली. या पेन ड्राईव्हमध्ये नसीर बागवान याचे स्टिंग ऑपरेशन आहे.

    मुंबईतला बडा नेता बारामतीत

    ज्यात कशाप्रकारे तो राजकीय नेता बारामतीत गेला…. तो नेता बारामतीचा नाही, तर मुंबईचा मोठा नेता आहे. मुंबईचा नेता कसा बारामतीत गेला आणि कशाप्रकारे मध्यस्थी केली हे तो सांगतो आहे. त्यात तो हे सुद्धा सांगतो की, मुंबईतील कुख्यात डॉन हाजी मस्तान याने मुंबईतील एका नामांकित बिल्डल आर. के. शाह यांचे अपहरण केले होते. त्यावेळी इसाकने हाजी मस्तान सोबत मध्यस्थी करुन त्यांना सोडले होते. त्या बदल्लयात त्याला मुंबई सेंट्रलला भावाच्या नावाने मिळाला असेही फडणवीस म्हणाले.

    Fadanavis Pendrive Bomb: Police Officer Isaac Bagwan – Baramati – Dawood Connection; Fadnavis detonates third pen drive bomb

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस