नगरपंचायत निवडणुकीमुळे टीकेच्या फैरी; नगरपंचायती निवडणुकीत पंकजा मुंडे-धनंजय मुंडे पुन्हा आमने सामने Face to face: Gopinath Munde did not teach us Pankajatai’s war-like politics!
विशेष प्रतिनिधी
बीड:बीड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.या निमीत्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं दिसत आहेत. पाटोदा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांची नुकतीच सभा पार पडली. या प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी निधी देण्याबद्दल घोषणा केली होती. निवडणुकीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडेंनी शंभर कोटींची घोषणा केली होती. पाच नगरपंचायतींसाठी पाचशे कोटी आणणार असं धनंजय मुंडे पाटोदा येथील जाहीर सभेत म्हणाले होते. यावर टीका करताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या –
32 व्या क्रमांकाचे मंत्री-
‘पालकमंत्री निवडणूक तोंडावर आल्यानंतर निधीच्या घोषणा करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी पैसे का दिले नाहीत? पैसे आणण्याची त्यांची ताकद नाही. ते राज्यातील 32व्या क्रमांकाचे मंत्री आहेत’, अशी टीका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली.
..तर मग दोन वर्षे काय टाळ कुटत बसला होता काय?
जिल्ह्याचे भले करण्याची भूमिका पालकाची असली पाहिजे. कुणाला तुरुंगामध्ये टाकायचे. कुणाचे घर बर्बाद करायचे, असले राजकारण आम्हाला गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलं नाही”. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि यांचा कबाडा होणार आहे”, अशी तोफ पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर डागली. 32 नंबरच्या खात्याचे मंत्री म्हणत पंकजा मुंडेंनी केलेली टीका धनंजय मुंडे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. केज नगरपंचायतच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी करत पंकजा मुंडेना प्रतिउत्तर दिलंय..
ताई औकात काढताना दोन वर्षा पूर्वीचा निकाल तर लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या वर टीका करा. कारण तुम्ही माझ्या ताई आहेत. यापूर्वी देखील 10 वेळा मी कधी तुम्ही टीका केली असेल. पण आज तुम्ही सामाजिक न्याय आणि विशेष विभागाची औकात काढली. 2019 ला निवडणूक लढवत होता त्या वेळी महिला बालकल्याण, जलसंधारण ,ग्रामविकास या खात्याचे नंबर मला माहित नाहीत. 32 व्या नंबर चे खाते 1 नंबर ला नेऊ शकतो, हा विश्वास पवार साहेबांना आहे. त्यामुळं त्यांनी हे खातं मला दिलं असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
Face to face: Gopinath Munde did not teach us Pankajatai’s war-like politics!
महत्त्वाच्या बातम्या
फिलिपाइन्समध्ये RAI चक्रीवादळाचा कहर, भीषण वादळामुळे 208 जणांचा मृत्यू, मोठ्या प्रमाणावर नुकसान
- TET Exam scam : तुकाराम सुपेंच्या पत्नी व मेहुण्याने लपवून ठेवलेलं 2.40 कोटींचं घबाड पोलिसांनी शोधलं…
- कोलकाता महापालिका निवडणूक : राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली फेरनिवडणुकीची मागणी, आज भाजपचा निषेध मोर्चा
- कोकणातील आंबा नवी मुंबईत आला हो; खवय्यांसाठी खुशखबर; २५ डझन आवक
- सोलापूरच्या मशिदीत प्रथमच लसीकरण शिबिर, नागरिकांचा भरभरून प्रतिसाद;४०० जणांना डोस
- परीक्षा घेण्यासंदर्भातील सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला – उदय सामंत