Lata Mangeshkar : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. गानसरस्वती असलेल्या लतादीदींच्या चाहत्यांकडून विविध माध्यमांद्वारे शोक व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच केंद्र सरकारनेही दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. लतादीदींच्या आवाजाची मोहिनी केवळ भारतीयांवरच नाही, तर जगावर होती. जगभरात त्यांचे चाहते आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. Expressing condolences on the demise of Lata Mangeshkar from the Prime Minister of Pakistan, Imran Khan said- The subcontinent has lost a great singer
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. गानसरस्वती असलेल्या लतादीदींच्या चाहत्यांकडून विविध माध्यमांद्वारे शोक व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच केंद्र सरकारनेही दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. लतादीदींच्या आवाजाची मोहिनी केवळ भारतीयांवरच नाही, तर जगावर होती. जगभरात त्यांचे चाहते आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
इम्रान खान यांनी ट्वीटरद्वारे आपला शोक संदेश दिला. ट्वीटमध्ये ते म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या निधनाने उपखंडाने खऱ्या अर्थाने एक महान गायिका गमावली आहे. त्यांची गाणी ऐकून जगभरातील अनेकांना खूप आनंद दिला आहे.
याचबरोबर नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अनेक लोकप्रिय गीतांमध्ये आपला आवाज देणाऱ्या लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने दु:ख झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण, तसेच कुटुंबीयांना माझ्या संवेदना, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
लता मंगेशकर पंचतत्वात विलीन
स्नेहार्द्र व्यक्तिमत्वाने संपन्न आणि सर्वांच्या आवडत्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आता त्या पंचतत्वात विलीन झाल्या. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपासून ते संगीतकार आणि गायक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या शोकाच्या काळात कुटुंबासोबत उभे होते. पीएम मोदी नेहमी लतादीदींना बडी दीदी म्हणायचे, त्यांना वाकून नमस्कार करायचे. लताजींच्या निधनाबद्दल भारत सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.
दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर भारतरत्न लता मंगेशकर रविवारी संध्याकाळी अखेरच्या प्रवासाला निघाल्या. मुंबईतील शिवाजी पार्कवर भाऊ हृदयनाथ आणि भाचा आदित्यने संध्याकाळी ७.१६ वाजता अग्नी प्रज्वलित केला. यावेळी त्यांच्या बहिणी उषा, आशा, मीना उपस्थित होत्या.
लताजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रही मुंबईत पोहोचले. त्यांनी लताजींच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर तिन्ही सैन्यांनी लतादीदींना अखेरचा निरोप दिला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या रीतीरिवाजानुसार धार्मिक विधी पार पडले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, पीयूष गोयल, अजित पवार यांच्यासह अनेक राजकारणी लताजींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. याशिवाय सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, जावेद अख्तर, रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक अभिनेते आणि फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते.
अखेरच्या यात्रेला हजारो लोकांची गर्दी
तत्पूर्वी लष्कराच्या जवानांनी लताजींचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून घराबाहेर आणले. यानंतर लष्कर, नौदल, हवाई दल आणि महाराष्ट्र पोलिसांच्या जवानांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या लष्करी ट्रकमध्ये ठेवून शिवाजी पार्कवर नेण्यात आले. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईतील हजारो लोक रस्त्यावर उतरले. लताजींचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून दुपारी १.१० वाजता त्यांच्या घरी पोहोचले होते.
Expressing condolences on the demise of Lata Mangeshkar from the Prime Minister of Pakistan, Imran Khan said- The subcontinent has lost a great singer
महत्त्वाच्या बातम्या
- लतादीदींच्या निधनाचा दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राज्यात उद्या (सोमवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर
- आयुष्यातील सर्वच क्षण सुमधुर सुरावटींनी जिवंत; उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञीला श्रद्धांजली
- “मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडोनि दोन्ही करा”; संगीत विश्वातून लतादीदींना श्रद्धांजली!!
- Lata Mangeshkar last Journey : गानसम्राज्ञीच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात, अखेरच्या निरोपाला लोकांची प्रचंड गर्दी
- Lata Mangeshkar : कोल्हापुरातील याच घरात गेलं लतादीदींचं बालपण, मंगेशकर कुटुंबीय १० वर्षे राहिले