• Download App
    ईडीच्या हाती लागले सर्व पुरावे, अनिल देशमुख यांनाही होणार अटक, मला धमकाविण्यात शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा हात, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा दावा |evidence in the hands of ED, Anil Deshmukh will also be arrested, Sharad Pawar, Supriya Sule's hand in threatening me, petitioner Jayashree Patil's claim

    ईडीच्या हाती लागले सर्व पुरावे, अनिल देशमुख यांनाही होणार अटक, मला धमकाविण्यात शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा हात, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनाही अटक होईल, असा दावा देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाºया अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात पडू नका म्हणून धमकी देखील देण्यात आली. त्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा हात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. evidence in the hands of ED, Anil Deshmukh will also be arrested, Sharad Pawar, Supriya Sule’s hand in threatening me, petitioner Jayashree Patil’s claim

    जयश्री पाटील म्हणाल्या, ईडीच्या कारवाईवर मी समाधानी आहे. माझ्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ईडीने देखील माझ्याच तक्रारीवर अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केलेली आहे. अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराने पिळले जात होते त्या सर्व पीडित लोकांची माहिती दिली आहे.



    त्यामुळे अनिल देशमुख यांना अटक केली पाहिजे, अशी माझी मागणी होती. अटक केली नाही तर ते पुरावे नष्ट करु शकतात. उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरणाचा डीवीआर अजून सापडलेला नाही. अनिल देशमुख यांच्या दोन सहकाºयांना ईडीने अटक केलेली आहे. त्याचबरोबर अनिल देशमुखांनाही ईडीने बोलावलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनाही अटक होईल.

    मला धमकीचे फोन आले. त्याबाबतचे पुरावे देखील मी दिले आहेत, असा आरोप करून पाटील म्हणाल्या, या धमकी देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा हात आहे. त्यांनी माझ्यावर कशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्याबाबत सविस्तर माहिती मी ईडीला दिलेली आहे. माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. अनिल देशमुख यांच्यावर कुणाचीही हात असला तरी त्यांना अटक होईल. माझ्याकडे बारमालकांनी पुरावे दिले होते.

    evidence in the hands of ED, Anil Deshmukh will also be arrested, Sharad Pawar, Supriya Sule’s hand in threatening me, petitioner Jayashree Patil’s claim

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा