• Download App
    VIDEO :‘’आमच्या राजकारणातही सकाळी नऊ वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळाचा प्रयत्न करतात, पण...’’ Even in our politics some people try to wrestle after getting drunk at nine in the morning Devendra Fadnavis

    VIDEO : ‘’आमच्या राजकारणातही सकाळी नऊ वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळाचा प्रयत्न करतात, पण…’’

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार टोला; ‘’समझने वालो को इशारा काफी…’’

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच नवनवीन आणि चर्चा, वाद निर्माण होईल अशा घडामोडी सुरू असतात. सध्या राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचं बोललं जात आहेत, मागील काही दिवसांमध्ये तशा काही घडामोडीही दिसून आल्या होत्या. मात्र जो भूकंप होणार आहे तो कोणासाठी नुकसानादायी ठरणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण, विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर निशाणा साधणे, टीका-टिप्पणी करणे सुरूच आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचं भाकीत केलं आहे. ज्यावरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. Even in our politics some people try to wrestle after getting drunk at nine in the morning Devendra Fadnavis

    याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. मात्र  देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खास पद्धतीने कोणाचाही नामोल्लेख न करता, समोरच्याला जोरदार टोला लगावल्याचे दिसून आले आहे. शिवाय फडणवीसांनी हा टोला नेमका कोणाला लगावला, त्याचे नावही जनतेला बरोबर समजले आहे.

    देवेंद्र फडणवीसांनी एका कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करत, त्यासोबत त्यांच्या भाषणातील वाक्यंदेखील जोडली आहेत. ज्याला सुरुवातास राजकारणात पण कुस्ती… असा मथळा जोडला आहे.

    या व्हिडीओत फडणवीस म्हणतात, ‘’राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत. पण आपल्याला माहीत आहे जसं कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं. आमच्या राजकारणातही अलीकडच्या काळामध्ये सकाळी नऊ वाजता काही लोक नशा करून, कुस्ती खेळाचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतून बादच व्हावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात, तेच कुस्त्या जिंकतात तुमच्या आशीर्वादाने आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे, २०२४ला पुन्हा जिंकू. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या. ‘’

    https://youtube.com/shorts/W7rASzJIXXA?feature=share

     

    शिवसेना फुटून ठाकरेंकडून धनुष्यबाण निघून गेले आणि आता हातावरून घड्याळही निसटले. एकूणच महाविकास आघाडीचे राजकीय प्रयोजन आता संपले आहे, असेच महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट होत आहे.

    Even in our politics some people try to wrestle after getting drunk at nine in the morning Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस