• Download App
    ऑनलाइन फसवणूक झाल्यासही मिळू शकते रक्कम परत, अडीच वर्षांत २३ कोटी २० लाख मिळाले परत|Even if there is online fraud, you can get the amount back, in two and a half years you got 23 crore 20 lakhs back

    ऑनलाइन फसवणूक झाल्यासही मिळू शकते रक्कम परत, अडीच वर्षांत २३ कोटी २० लाख मिळाले परत

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार दिल्यास गेलेली रक्कम परत मिळू शकते. पोलिसांनी अडीच वर्षांत पोलिसांनी २३ कोटी २० लाख ६३ हजारांची रक्कम मिळवली आहे. त्यामुळे त्वरित तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.Even if there is online fraud, you can get the amount back, in two and a half years you got 23 crore 20 lakhs back

    सायबर चोरटय़ांकडून फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ज्या तक्रारदारांनी त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अशा नागरिकांची फसवणूक रोखण्यात यश आले आहे. सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याकडून व्हॉट्सअप क्रमांक- ७०५८७१९३७१ किंवा ७०५८७१९३७५ सायबर पोलीस ठाणे- ०२०-२९७१००९७ इमेल- crimecyber.pune@nic.in ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.



    तक्रारदाराच्या खात्यातील रक्कम चोरटे दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यापूर्वी सायबर पोलिसांनी त्वरित तक्रारादाराचे ज्या बँकेत खाते आहे, तेथील अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून चोरटय़ांच्या खात्यात वळते होत असलेली रक्कम परत मिळवली आहे. गेल्या अडीच वर्षांत पोलिसांनी २३ कोटी २० लाख ६३ हजारांची रक्कम मिळवली आहे तसेच सायबर गुन्ह्य़ातील ६० लाखांची रक्कम चोरटय़ांकडून जप्त करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत असून सायबर चोरटे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून गंडा घालत आहेत.

    ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रारदारांनी अशा प्रकारांची माहिती त्वरित (गोल्डन अवर) सायबर पोलीस ठाण्यात देणे गरजेचे असते. सायबर चोरटे ऑनलाइन खरेदी तसेच व्यवहारात तक्रारदाराची गोपनीय माहिती घेऊन ऑनलाइन पद्धतीने रोकड लांबवितात. अशा परिस्थितीत अनेक नागरिकांना तक्रार कोठे आणि कशी करायची, याची माहिती देखील नसते.

    सायबर पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रार केल्यास त्वरित चोरटय़ांच्या खात्यात वळविली गेलेली रक्कम किंवा व्यवहार थांबविण्यासाठी संबंधित बँकेकडे तक्रार करता येणे शक्य होते. चोरटय़ाने एखादा व्यवहार केल्यास त्वरित त्याचे स्क्रीनशॉट, संदेश, बँकेचे नाव, खाते क्रमांक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड क्रमांक, लिंक मोबाइल क्रमांक याबाबतची माहिती सायबर पोलिसांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठविल्यास किंवा स्क्रीनशॉट पाठविल्यास ज्या खात्यातून पैसे काढण्यात आले असतील, त्या बँकेबरोबर संपर्क साधण्यात येतो.

    तसेच चोरटय़ाने ज्या बँकेच्या खात्यात पैसे वळवले असतील, त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देणे शक्य होते. त्यामुळे सायबर चोरटय़ाने के लेल्या फसवणुकीला वेळीच आळा घालणे शक्य होते, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Even if there is online fraud, you can get the amount back, in two and a half years you got 23 crore 20 lakhs back

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस