• Download App
    आरोग्यमंत्र्यांच्या दाव्यानंतरही रेमडीसीवर मिळेना, नाशिकमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर|Even after the claim of the health minister, they did not get it on the remedisiver, angry citizens on the streets in Nashik

    आरोग्यमंत्र्यांच्या दाव्यानंतरही रेमडीसीवर मिळेना, नाशिकमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर

    नाशिक : राज्यात रेमडीसीवरचा पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला असला तरी प्रत्यक्षात इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे नाशिकमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.Even after the claim of the health minister, they did not get it on the remedisiver, angry citizens on the streets in Nashik


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : राज्यात रेमडीसीवरचा पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला असला तरी प्रत्यक्षात इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे नाशिकमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

    गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात रेमडीसीवर इंजेक्शनची टंचाई आहे. काळ्या बाजारात मात्र इंजेक्शन मिळत आहे. प्रशासनाकडून यावर कारवाईचा दिखावा केला जातोय. आपला नातेवाईक रुग्णांचे हाल पाहवत नसल्याने नागरिक संतप्त झाले. त्यांनी शहरातील महात्मा गांधी रोडवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.



    नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु रेमडीसीवर इंजेक्शन मिळत नसल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून रुग्णाच्या नातेवाईकांना वणवण करण्याची वेळ आली आहे.

    जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात इंजेक्शन पुरवण्याचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात डॉकटर रुग्णांना इंजेक्शन लिहून देत आहेत. त्यामुळे निवडक मेडिकल दुकानांसमोर सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागत आहेत.

    अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन नंबरही कोणी उचलत नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता महात्मा गांधी रोडवर आंदोलन सुरू केले आहे.

    Even after the claim of the health minister, they did not get it on the remedisiver, angry citizens on the streets in Nashik

    हे ही वाचा

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस