• Download App
    किरीट सोमय्यांचे म्हणणे खोडून काढा प्रविण दरेकर यांचे आव्हान|Erase Kirit Somaiya's statement Challenge of Pravin Darekar

    किरीट सोमय्यांचे म्हणणे खोडून काढा प्रविण दरेकर यांचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कुठल्याही विषयाचे टेंडर किंवा काम त्या विषयातील व्यवसाय करणारी व्यक्ती किंवा संस्था करू शकते. चहावाल्याला मेडिकलचे कंत्राट कसे दिले जावू शकते? मेडिकलशी संबंधित नसणाऱ्यांनी हे कंत्राट घेतले, हा सोमय्या यांचा आक्षेप बरोबर नसेल तर त्यांचे म्हणणे खोडून काढावे, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिले. Erase Kirit Somaiya’s statement
    Challenge of Pravin Darekar

    पुण्यातील जंबो कोविड सेंटरचे कंत्राट चहावाल्याला देण्यात आले, या आरोपावरून प्रसारमाध्यमांशी दरेकर बोलत होते. ते म्हणाले की, शंभर-दीडशे कोटी रुपयांचे हे कोविड सेंटरचे कंत्राट देत असताना ज्यांचे उत्पन्न १ लाख रुपयेही नाही त्यांना ते दिले गेले.



    किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध मानहानीची नोटीस

    दरम्यान, लाईफ लाईन सर्व्हिसेसचा संजय राऊत किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर काहीही संबंध नाही. किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध आम्ही मानहानीची नोटिस आम्ही पाठवत आहोत, असे निवेदन डॉ. हेमंत गुप्ता यांच्या लाईफ टाइम हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या वतीने सुजित पाटकर यांनी दिले आहे.

    कोरोना सारख्या भयंकर महामारीच्या काळात ओपन टेंडर प्रक्रियेतून हे टेंडर करण्यात आले होते. या काळात कुठलेही अनुभवी डॉक्टर किंवा दवाखाने यांना या रोगाचा अंदाज नव्हता व अभ्यास सुद्धा नव्हता. अशा वेळी डॉ. हेमंत गुप्ता संजय शाह, राजू साळुंके आणि काही इच्छुक मंडळींनी यांच्यात पुढाकार घेतला. या रोगावर मात करण्याचा प्रयत्न केला, असे निवेदनात म्हटले आहे.

    आता महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे या रोगाची परिस्थिती निवळली आहे. किरीट सोमय्यांसारखे राजकीय नेते यांचे राजकारण करून आमच्या प्रयत्नांना तोंडघशी पाडू इच्छितात. डॉ. हेमंत गुप्ता यांच्या साह्याने आणि पुढाकाराने आम्ही टेंडर प्रक्रियेत भाग घेतला होता. ते आम्हाला देण्यात आले होते, असे निवेदनात म्हटले आहे.

    Erase Kirit Somaiya’s statement Challenge of Pravin Darekar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस