Enforcement Directorate probe : अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांची चौकशी सुरू केली आहे. ई़डीने दळवी यांना 25 जूनपासून आतापर्यंत चार ते पाचवेळा बोलावून चौकशी केल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी एचडीआयएलचे मालक राकेश वाधवान यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. प्रमोद दळवी यांच्या चौकशीतून वसई-विरारमधील बांधकाम व्यावसायिकांसह मुंबईतील शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता यातून वर्तवण्यात येत आहे. Enforcement Directorate probe into Shiv Sena leader Pramod Dalvi in PMC Bank Scam Case
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांची चौकशी सुरू केली आहे. ई़डीने दळवी यांना 25 जूनपासून आतापर्यंत चार ते पाचवेळा बोलावून चौकशी केल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी एचडीआयएलचे मालक राकेश वाधवान यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. प्रमोद दळवी यांच्या चौकशीतून वसई-विरारमधील बांधकाम व्यावसायिकांसह मुंबईतील शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता यातून वर्तवण्यात येत आहे.
कोण आहेत प्रमोद दळवी?
प्रमोद दळवी हे शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक आहेत. ते वसई विरारसह मुंबईतील बांधकाम आणि हॉटेल व्यवसायिक आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराची धुराही प्रमोद दळवी यांनी सांभाळली होती.
नोटबंदीच्या काळातही झाली होती चौकशी
2016 मध्ये नोटबंदी काळात शिवसेनेचे तत्कालीन उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक धनंजय गावडे यांना 1 कोटी 15 लाखांच्या नव्या नोटांसह प्राप्तिकर विभागाने आणि लोकल क्राइम ब्रँचने पकडले होते. त्या नव्या नोटा प्रमोद दळवी यांच्या घरातून गावडे यांनी घेतल्याचे तपासातून समोर आले होते. याच घटनेत गावडे आणि प्रमोद दळवी यांच्या घरांची दोन दिवस तपासणीही झाली होती.
Enforcement Directorate probe into Shiv Sena leader Pramod Dalvi in PMC Bank Scam Case
महत्त्वाच्या बातम्या
- EDचा अनिल देशमुखांना जबरदस्त दणका, 4 कोटी नाही, तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता केली जप्त !
- लखनऊमध्ये प्रियांका गांधींसह शेकडो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल, कलम 144चे उल्लंघन केल्याचा आरोप
- अमेरिकेने भारताला सोपवले घातक MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर्स; अशी आहेत वैशिष्ट्ये
- UGC Academic Calendar : यूजीसीची शैक्षणिक दिनदर्शिका जाहीर, महाविद्यालयांनी 30 सप्टेंबरपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश
- येदियुरप्पा लवकरच कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, कोण होणार पुढचा सीएम? वाचा सविस्तर… काय आहे कारण?