Waqf Board land scam case : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने पुणे वक्फ बोर्ड जमीन घोटाळा प्रकरणाचा तपास स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी आज ईडीने अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. वक्फ बोर्ड नवाब मलिक यांच्या अंतर्गत येते. ईडीचे 7 ठिकाणी छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. Enforcement Directorate is conducting raids at seven locations in Pune, in connection Waqf Board land scam case
वृत्तसंस्था
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने पुणे वक्फ बोर्ड जमीन घोटाळा प्रकरणाचा तपास स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी आज ईडीने अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. वक्फ बोर्ड नवाब मलिक यांच्या अंतर्गत येते. ईडीचे 7 ठिकाणी छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा
याप्रकरणी पुणे पोलिसांनी ऑगस्टमध्ये दोन अधिकाऱ्यांना अटक केली होती. या अधिकाऱ्यांवर पदावर असताना ७.७६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप होता. आता या प्रकरणाचा तपास ईडीने स्वतःकडे घेतला आहे. मात्र, ईडीचे छापे कुठे सुरू आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नवाब मलिकांची भाजप नेत्यांवर आगपाखड
ईडीने पुणे वक्फ बोर्डाच्या विरोधात ही कारवाई अशा वेळी केली आहे जेव्हा नवाब मलिक क्रूझ ड्रग्जप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर हल्ला करत आहेत. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून अंडरवर्ल्डमधील लोकांना पदे देऊन बनावट नोटांचे रॅकेट चालवल्याचा आरोप केला होता.
मलिक कुटुंबीयांकडून फडणवीसांना बदनामीची नोटीस
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नवाब मलिकांची कन्या आणि जावई समीर खान यांनी ५ कोटींची मानहानीची नोटीस पाठवली आहे. याबाबत नवाब मलिक म्हणाले की, “फडणवीस काही दिवसांपूर्वी माझ्या जावयाकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप करत होते. आता माझ्या मुलीने या आरोपावर फडणवीस यांना कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप केल्यावरून नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे. माफी मागितली नाही तर मानहानीचा खटला दाखल करू.
Enforcement Directorate is conducting raids at seven locations in Pune, in connection Waqf Board land scam case
महत्त्वाच्या बातम्या
- चारधाम प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, केंद्र आणि स्वयंसेवी संस्थांना मंजुरीसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय सुचवण्याचे निर्देश
- सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची आयएसआयएस आणि बोको हराम बरोबर तुलना; राजकीय क्षेत्रात वादळ, तक्रार दाखल
- देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,091 रुग्ण आढळले, रिकव्हरी रेट 98.25 टक्क्यांवर
- फ्रान्समध्ये कोरोनाची 5वी लाट सुरू, सलग दुसऱ्या दिवशी 10,000 हून अधिक रुग्ण आढळले, सरकारने दिला इशारा
- स्पेसएक्स रॉकेटवरून 4 अंतराळवीर ISS साठी रवाना, भारतीय अमेरिकन राजा चारी करणार ‘क्रू 3’ मिशनचे नेतृत्व