• Download App
    विधानसभा अध्यक्ष निवडणूक "राजकीय गॅसवर" Election of Speaker of the Legislative Assembly by voice voting

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक “राजकीय गॅसवर”; भुजबळ, शिंदे, थोरात राज्यपालांना भेटले; उद्या राज्यपाल काय उत्तर देणार??

    प्रतिनिधी

    मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आधीच दिलेले पत्र घेऊन महाविकास आघाडीचे तीन मंत्री छगन भुजबळ एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात आज राज्यपाल भगतसिंह होशियारी यांना भेटले.Election of Speaker of the Legislative Assembly by voice voting

    विधानसभेने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदर्भात आवाजी मतदानाने निर्णय करण्याचे ठरविले आहे, असे या तीन मंत्र्यांनी राज्यपालांना सांगितले. त्यावर घटनातज्ञ मंडळींची चर्चा करून उद्या निर्णय कळवितो, असे राज्यपालांनी यातील मंत्र्यांना सांगितले आहे. राज्यपालांनी आज ताबडतोब कोणताही निर्णय दिला नाही त्यामुळे महा विकास आघाडीने मनसुबा रचलेले विधानसभेचे अध्यक्षपद पुन्हा राजकीयदृष्ट्या गॅसवर गेले आहे.


    तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान


    राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा आणि विधिमंडळ समितीचा निर्णय मंजूर केल्याशिवाय विधानसभा अध्यक्षांची निवडणूक महाविकास आघाडीला आवाजी मतदानाने घेता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र आधीच राज्यपालांकडे पोहोचले आहे. याच पत्राची प्रत घेऊन छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे तीन मंत्री राज्यपालांकडे गेले होते. हे पत्र राज्यपालांनी स्वीकारले आहे. परंतु महाविकास आघाडीला अपेक्षित असा निर्णय त्यांनी लगेच दिला नाही. उलट विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्यासंदर्भात घटनातज्ञ मंडळींची चर्चा करून मी नंतर कळवितो, असे राज्यपाल भगतसिंह होशियारी यांनी या मंत्र्यांना सांगितले आहे.

    महा विकास आघाडीच्या सरकारच्या निर्णयाच्या कायदेशीर नाड्या राज्यपालांच्या हातात असल्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांची निवड महाविकास आघाडीने ठरविल्यानुसार उद्या होईल की नाही याविषयी आता शंका महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उपस्थित होताना दिसत आहे.

    Election of Speaker of the Legislative Assembly by voice voting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!