विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 17 फेब्रुवारी 2023 देशाच्या राजकीय इतिहासातील प्रादेशिक पक्षांमधल्या घराणेशाही संदर्भात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला आहे. प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीच्या अंतावर निवडणूक आयोगाने कायदेशीर शिक्कामोर्तब करत शिवसेनेसंदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. Election commission sealed the fate of Dynasty politics in negation; the name Shivsena and symbol bow and arrow goes to eknath shinde, major blow to Uddhav Thackeray
शिवसेनेवर उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व केवळ घराणेशाहीच्या आधारावर राहू शकत नाही, असाच हा निकाल आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना या नावासह शिवसेनेचे मूळ निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कायदेशीर रित्या बहाल केले आहे.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांनी नेमलेले शिवसेना पक्षप्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला अखंड शिवसेनेने भाजपशी युती करून महाराष्ट्राची दोनदा सत्ता मिळवली होती. पण 2019 मध्ये महायुतीला बहुमत असूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी आणि सोनिया गांधी यांच्या काँग्रेसशी संधान बांधून महाविकास आघाडी स्थापन केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवले. पण अडीच वर्षानंतर आपल्याच शिवसेनेत झालेल्या बंडात स्वतःचे उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे मुख्यमंत्री पद गमावले. त्यानंतरच्या सहाच महिन्यांमध्ये स्वतःच्या वडिलांनी आजोबांच्या आशीर्वादाने स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि चिन्हही अधिकृतरित्या गमावण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची??, या वादाचा निकाल शिंदेंच्या बाजूने दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल असल्यामुळे त्याला कायदेशीर अधिमान्यता आहे. अर्थात उद्धव ठाकरे यांचा गट या निकाला विरोधात सुप्रीम कोर्टात जरूर जाईल, पण निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालातून “एडव्हांटेज एकनाथ शिंदे” हे सिद्ध झाले आहे.
त्याहीपेक्षा महत्त्वाची घडामोड निवडणूक आयोगाच्या निकालाच्या निमित्ताने घडली आहे, ती म्हणजे कोणताही राजकीय पक्ष असो मग तो प्रादेशिक का असेना… एखाद्या व्यक्तीने आपल्या लोकप्रियतेच्या बळावर स्थापन केला असेल, तर तो केवळ वारसा स्वरूपाने त्या व्यक्तीच्या घराण्यात कायमचा राहू शकत नाही. आणि तो ठेवण्याचा बळजबरीने प्रयत्न केला, तर त्या घराण्याविरुद्ध बंड होते आणि ते बंड जर लोकशाही तत्त्वावर आधारित असेल, संख्याबळाचा त्याला कायदेशीर आधार असेल, तर संबंधित प्रादेशिक पक्ष देखील केवळ घराणेशाहीच्या वारसाच्या आधारे त्या विशिष्ट व्यक्तीच्या घराण्याकडे सोपवता येणार नाही, तर संख्याबळाच्या आधारे बंड करणाऱ्या व्यक्तीकडे तो अधिकृतरित्या सोपविता येईल हेच निवडणूक आयोगाच्या आजच्या निकालाने सिद्ध केले आहे.
दोन्ही बाजूंच्या सुनावणीनंतर निर्णय
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक महत्वाचा वाद म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे होणार शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे होणार? हा विषय चर्चेत होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने याविषयावर दोन्ही गटाची सुनावणी घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय राखून ठेवला होता. अखेर शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदे यांची सरशी झाली आहे.
निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळावे या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. त्यावेळी ठाकरे गटानेही कॅव्हेट दाखल करून ठाकरे गटाची बाजू ऐकून घेऊनच निर्णय द्यावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सुनावण्या निवडणूक आयोगाने घेतल्या, मधल्या काळात पोट निवडणुकीच्या वेळी आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. मात्र आत निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
Election commission sealed the fate of Dynasty politics in negation; the name Shivsena and symbol bow and arrow goes to eknath shinde, major blow to Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे की शिंदे वादात एडव्हांटेज शिंदे; धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
- जॉर्ज सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने हात झटकले खरे, पण दोघांचेही मुद्दे सारखेच कसे??
- बीबीसीची डॉक्युमेंटरी मोदी विरोधी प्रपोगंडा आणि लांच्छनास्पद पत्रकारिता; कॉन्सर्वेटिव्ह ब्रिटिश खासदाराचाच हल्लाबोल