• Download App
    तुमच्या पोटदुखीवर आमच्याकडे जालीम उपाय; अजितदादांसह सर्व विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत टोलेEknath shinde targets ajit Pawar and opposition in maharashtra legislative assembly

    तुमच्या पोटदुखीवर आमच्याकडे जालीम उपाय; अजितदादांसह सर्व विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत टोले

    प्रतिनिधी

    मुंबई : फक्त निवडणुकासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. अजितदादा तुम्ही गोड बोलतात, पण तुमच्या कार्यक्रम सुरू असतो. त्यामुळे पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील, त्यामुळे जालीम औषध शोधून ठेवले आहे. बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केला आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना लगावला. Eknath shinde targets ajit Pawar and opposition in maharashtra legislative assembly

    विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले यावेळी त्यांनी अजितदादांसह विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. आम्हाला सारखे घटनाबाह्य सरकार, खोके सरकार, असे चिडवले जाते. मग आम्ही जर घटनाबाह्य सरकार असू तर तुमचे विरोधी पक्षनेते पद पण घटनाबाह्य आहे का??, असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना केला

    ‘सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यात अंधारी आली आहे. त्यामुळे आमचे काम दिसत नाही. दिसत असलं तरी तुम्ही बोलत नाही. चांगल्याला चांगलं म्हणण्याचं विरोधकांचं काम आहे, तुमचं मोती बिंदूचं ऑपरेशन करावं लागेल, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

    एकनाथ शिंदे म्हणाले :

    अडीच वर्षांमध्ये सगळे प्रकल्प थांबले होते. तुम्ही सुद्धा होता तिथे, पुढील दोन वर्षांमध्ये सर्व प्रकल्प मार्गी लावणार आहे. महाराष्ट्रापुढे नवीन चित्र निर्माण करणार आहे.

    दावोसमध्ये मागच्या वेळी 50 हजार कोटींचे करार झाले होते. त्या कंपनीचे नाव घेत नाही, पण एकाही कंपनीची गुंतवणूक झाली नाही. दिल्लीची कंपनी होती. सामंजस्य करार होते, आपल्याकडे गुंतवणूक मोठी येईल.

    दावोसमध्ये ४२ कोटी रुपये खर्च झाले बोलतात पण प्रत्यक्षात ३५ कोटी रुपये खर्च झाले आहे. महाराष्ट्र पॅव्हिलियेन सर्वात चांगले होते. मागच्या वर्षी मध्य प्रदेश पॅव्हिलियेनमधून खूर्चा आणि टेबले आणावी लागली होती. आमच्याकडे जागा आहे, इंडस्ट्रीसाठी जागा आहे, सोईसुविधा आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर आपल्याकडे गुंतवणूक सुरू झाली आहे. आता आपल्याकडे रोजगार निर्माण झाले आहेत.

    Eknath shinde targets ajit Pawar and opposition in maharashtra legislative assembly

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस