• Download App
    ‘’घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत’’ एकनाथ शिंदेनी लगावला टोला!Eknath Shinde indirectly criticized Uddhav Thackeray

    ‘’घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत’’ एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!

    ‘’मी सगळ्यांना कामाला लावलं आहे ही वस्तूस्थिती आहे.’’ असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यातून शेकडोच्या संख्येने रामभक्त अयोध्येला रवाना झाले आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वत: ठाणे स्टेशनवर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.  Eknath Shinde indirectly criticized Uddhav Thackeray

    ‘’माझ्या दौऱ्याची धास्ती घेतली किंवा नाही हे काही मी म्हणणार नाही. परंतु मी सगळ्यांना कामाला लावलं आहे ही वस्तूस्थिती आहे. सगळे आता घरात बसायचे ते रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत ही चांगली बाब आहे.’’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावल्याचे दिसून आले.

    याशिवाय, अयोध्या दौऱ्यात मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहे. अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी व्हावा, यासाठी भाजपाही मैदानात उतरली आहे. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच, उत्तर प्रदेशातील भाजपाचे आमदार त्यांच्यासोबत असणार आहेत.

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून टिप्पणी केली होती. एकनाथ शिंदे यांना अयोध्येचा रस्ता आम्ही दाखवलाय, त्यांना याअगोदर अयोध्येची वाट तरी माहीत होती का? आम्ही दाखवली आहे. असं संजंय राऊत म्हणाले होते.

    Eknath Shinde indirectly criticized Uddhav Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक