• Download App
    ऐन गणेशोत्सवात भाजप नगरसेविकेसह आठ महिला तुरुंगात, उत्सवाच्या काळात खोदाई करू नका म्हणून केले आंदोलन|Eight women including BJP corporator in jail for agitation against corporation

    ऐन गणेशोत्सवात भाजप नगरसेविकेसह आठ महिला तुरुंगात, उत्सवाच्या काळात खोदाई करू नका म्हणून केले आंदोलन

    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन करणाऱ्या भाजप नगरसेविकेसह सात महिलांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.महापालिका भवनात आंदोलन करणाऱ्या भाजप नगरसेविका आशा धायगुडे – शेंडगे यांच्यासह सात महिलांना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने ऐन गणेशोत्सवात 14 दिवस तुरुंगात काढावे लागणार आहेत.Eight women including BJP corporator in jail for agitation against corporation

    नगरसेविका आशाताई तानाजी धायगुडे/शेंडगे त्यांच्या समर्थक महिला पूजा अरविंद भंडारी (वय २५), शितल पंकज पिसाळ (वय २१), गौरी कमलाकर राजपाल (वय ३१), आशा जयस्वाल (वय ४०), शीतल महेश जाधव (वय ३६), जयश्री रामलिंग सनके (वय ३०), संध्या रमेश गवळी (वय ४७), स्वप्निल भारत आहेर (वय २१), संजय शंकर पवार ( वय १९, सर्व रा. कासारवाडी, पुणे), अशी त्यांची नावे आहेत.



    आशा शेंडगे कासारवाडी-दापोडी प्रभागाच्या नगरसेविका आहेत. कासारवाडीत भूमिगत गटारांची कामे सुरू असल्याने रस्ते खोदले आहेत. मात्र, त्यांनी गणेशोत्सवानंतर खोदाई करावी, अशी मागणी करीत काम बंद पाडले होते. तरीही काम सुरूच होते.

    त्यामुळे नगरसेविका शेंडगे आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिका भवनात आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकून फलकाला काळे फासले.

    आयुक्तांना व्हिडिओ काॅन्फरन्सिंगला जाण्यास अटकाव केला. सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पिंपरी पोलिसांनी नगरसेविका शेंडगे यांच्यासह १० जणांना अटक केली.

    Eight women including BJP corporator in jail for agitation against corporation

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!