• Download App
    देशात लवकरच आठ नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू होणार, जळगाव जिल्ह्याचाही समावेश । eight news flying Training Academies in india including jalgaon and belgaon

    देशात लवकरच आठ नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू होणार, जळगाव जिल्ह्याचाही समावेश

    flying Training Academies : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) मुक्त हवाई उड्डाण प्रशिक्षण धोरणाअंतर्गत भारतात 8 नव्या हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहेत. या नव्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये जळगाव, बेळगाव, कलबुर्गी, खजुराहो आणि लीलाबारी या ठिकाणांचा समावेश आहे. eight new flying Training Academies in india including jalgaon and belgaon


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) मुक्त हवाई उड्डाण प्रशिक्षण धोरणाअंतर्गत भारतात 8 नव्या हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहेत. या नव्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये जळगाव, बेळगाव, कलबुर्गी, खजुराहो आणि लीलाबारी या ठिकाणांचा समावेश आहे.

    जागतिक पातळीवर भारताला विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी उड्डाण प्रशिक्षण केंद्रांऐवजी देशातच प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी या अकादमींची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच भारताच्या शेजारी देशांतील विद्यार्थ्यांच्या हवाई उड्डाण प्रशिक्षणविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

    हवामानविषयक समस्या आणि नागरी तसेच लष्करी हवाई वाहतुकीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे प्रशिक्षण केंद्रांसाठी अत्यंत काळजीपूर्वकरीत्या या पाच विमानतळांची निवड करण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत भारतीय हवाई उड्डाण क्षेत्र अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

    या हवाई प्रशिक्षण केंद्रांचे टेंडर भरणे अधिक आकर्षक बनविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने केंद्रांच्या वार्षिक भाडेशुल्कात लक्षणीय कपात करून ते 15 लाख रुपये केले आहे. त्याशिवाय ही केंद्रे अधिक व्यवसायस्नेही व्हावीत म्हणून विमानतळ मानधनाची संकल्पनादेखील मोडीत काढण्यात आली आहे. भारतात सुरू होणाऱ्या 8 नव्या हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमींमध्ये जळगावचाही समावेश झाल्याने महाराष्ट्रासाठी तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

    eight new flying Training Academies in india including jalgaon and belgaon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rupee : रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर; अमेरिकी टॅरिफमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया 64 पैशांनी घसरून 88.29 वर

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा सरकारला प्रश्न- सीमेवर भिंत बांधायची आहे का? शेजारील देशांमध्ये आपल्यासारखेच बंगाली-पंजाबी भाषिक

    BJP Protests : राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या पुतळ्यांचे दहन; PM मोदींबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा भाजपकडून निषेध