प्रतिनिधी
मुंबई : सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आज सकाळ पासून जी धडक कारवाई सुरू केली आहे, त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे लपेट्यात आले आहेत. श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने मंगळवारी दुपारनंतर मोठी धडक कारवाई करून त्यांची 6.45 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.ED Uddhav Thackeray: ED’s heel on CM’s brother-in-law Shridhar Patankar’s assets worth Rs 6.45 crore; 11 flats in Thane also seized
आज सकाळच्या सत्रात तपास यंत्रणांनी महाराष्ट्रातील हिरानंदानी ग्रुपच्या तसेच अनेक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांच्या ठिकाणांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातले. विशेष म्हणजे ईडीच्या पथकाने मुंबईतील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील घरावर छापा टाकला. छाप्यात मुंबईतील प्रसिद्ध हिरानंदानी ग्रुपचाही समावेश आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी 8 ते 9 च्या सुमारास कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमध्ये पोहोचले आणि नवाब मलिक यांच्या घरी छापा घालून कुटुंबीयांकडून कागदपत्रे मिळवत तपास सुरू केला. या टीममध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीआरपीएफची मोठी तुकडीही त्यांच्यासोबत आहे.
आजही छापे
याच गोवावाला कंपाऊंडजवळील जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारीला नवाब मलिकांना अटक केली होती. या जमिनीशी संबंधित व्यवहारांची अधिक माहिती मिळविण्यासाठी ईडीच्या पथकाने हा छापा टाकला आहे. ईडीच्या हाती कोणते नवे पुरावे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आजच्या छाप्यानंतर नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार आहेत हे निश्चित.
कोठडीत बेड आणि खुर्ची
नवाब मलिक सध्या 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड तुरुंगात आहे. दाऊद इब्राहिम आणि मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सोमवारी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. नवाब मलिक यांना पाठदुखीची तक्रार असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले. त्यावर न्यायालयाने त्यांना बेडवर झोपण्याची परवानगी दिली. त्यांना गाद्या, चटई आणि खुर्च्या वापरण्याची परवानगी आहे, परंतु सध्या त्यांना घरी बनवलेले अन्न खाण्याची परवानगी नाही.
224 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त
महाराष्ट्रातील पुणे आणि ठाण्यासह 23 ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापासत्र सुरू आहे. या छाप्यांमध्ये 224 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हे छापे पाच राज्यांमध्ये 23 हून अधिक ठिकाणी पडले आहेत. महाराष्ट्रातील पुणे आणि ठाण्यातील युनिकॉर्न स्टार्ट अप ग्रुप्सवर आयकर विभागाने छापे टाकले होते.
यानंतर प्राप्तिकर विभागाने सुमारे 224 कोटी रुपयांच्या बेनामी संपत्तीचा शोध घेतला. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने रविवारी (ता. 20 ) याबाबतची माहिती दिली. 9 मार्चला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील 23 ठिकाणी छापे टाकण्यात आले. रविवारी कर मंडळाने या संदर्भात नोटीस जारी केली तेव्हा ही बाब समोर आली.
ED Uddhav Thackeray: ED’s heel on CM’s brother-in-law Shridhar Patankar’s assets worth Rs 6.45 crore; 11 flats in Thane also seized
महत्त्वाच्या बातम्या
- Shivsena – NCP Fued : आता खुद्द पवारांच्या घरातून शिवसेना पोखरायला आणि श्रीरंग बारणेंना डिवचायला सुरुवात; रोहित पवार म्हणाले, पार्थच्या प्रचाराला जाईन!!
- अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यात घाई!!; संजय राऊतांनी पवारांची दाखवली चूक की देशमुखांच्या जखमेवरची काढली खपली??
- टेकडीवर जोडप्याला लूटणारे सराईत गुन्हेगार जेरबंद मराठवाड्यासह विविध जिल्हयात 14 गुन्हे दाखल
- टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर कोलकाता येथे हिंसाचार; घरांना लावलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू