ED to probe Jacqueline Fernandes : बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीनंतर अंमलबजावणी संचालनालय आज बॉलिवूडची आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करणार आहे. या दोन्ही अभिनेत्रींची मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत चौकशी केली जात आहे. ईडीने या दोघींची आधीही चौकशी केली आहे. तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांची खंडणीप्रकरणी चौकशी केली जात आहे. ईडीने नोराची सुमारे 7 तास चौकशी केली. ED to probe Jacqueline Fernandes today after Nora in Rs 200 crore money laundering case
प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीनंतर अंमलबजावणी संचालनालय आज बॉलिवूडची आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करणार आहे. या दोन्ही अभिनेत्रींची मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत चौकशी केली जात आहे. ईडीने या दोघींची आधीही चौकशी केली आहे. तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांची खंडणीप्रकरणी चौकशी केली जात आहे. ईडीने नोराची सुमारे 7 तास चौकशी केली.
नोराने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत
नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस या चित्रपट जगतातील दोन प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या स्वत:च्या शैलीने चित्रपट जगतात छाप उमटवली आहे. गुरुवारी नोरा फतेही काळा ड्रेस परिधान करून दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचली. नोराने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत.
नोहा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांची तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून 200 कोटी रुपयांच्या फसवणूक आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी केली जात आहे. सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना हे दोघेही सध्या ईडीच्या रिमांडवर आहेत.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोघांची आधी चौकशी करण्यात आली होती आणि येत्या काही दिवसांत त्यांना सुकेश प्रकरणात त्यांच्याविरुद्ध साक्षीदार बनवले जाण्याची शक्यता आहे. ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, दोघींचेही जबाब पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
ED to probe Jacqueline Fernandes today after Nora in Rs 200 crore money laundering case
महत्त्वाच्या बातम्या
- सिंघू बॉर्डरवर तरुणाची हत्या, आधी हात कापला, मग गळा चिरला; शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर लटकावला मृतदेह
- पंतप्रधान मोदींनी मिसाइल मॅन डॉ.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन , म्हणाले – नेहमी लोकांसाठी प्रेरणा राहील
- पंतप्रधान मोदींनी मिसाइल मॅन डॉ.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन , म्हणाले – नेहमी लोकांसाठी प्रेरणा राहील
- देशात लोकसंख्येचे असंतुलन परवडणारे नाही, राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरण सर्वांसाठी समानच हवे; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
- ब्रिटनसह जगभरातील ३० राष्ट्रांकडून भारताच्या कोरोनाविरोधी लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता