वृत्तसंस्था
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच 6.30 च्या सुमारास ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा घातला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली आहे. ED Raids On Anil Parab: ED raids 7 places including Transport Minister Anil Parab’s official residence
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्या घरावर आणि अन्य 7 ठिकाणी ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. अनिल परब यांच्या बरोबरच आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या पुण्यातल्या निवासस्थानावर देखील ईडीचे अधिकारी पोहोचून त्यांनी छापा घातला आहे.
आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर छापा घातला आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. पोलीस बदली प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. ईडीने दापोली रिसॉर्ट प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
– सचिन वाझे कनेक्शन?
पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परब यांचे नाव समोर आले होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरू झाला. त्याच अनुषंगाने ईडीने आज छापा घातला.
– किरीट सोमय्यांचे ट्विट
अनिल परब यांनी आता आपली बॅग भरावी अशी उपरोधिक प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. अनिल परब यांच्यावर आता ईडीकडून अटकेची कारवाई होण्याचे संकेत सोमय्या यांनी दिले. अनिल परब यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर लागणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
ED Raids On Anil Parab: ED raids 7 places including Transport Minister Anil Parab’s official residence
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण संघटना शरद पवारांकडे चर्चेला गेल्याच कशाला??; प्रकाश महाजन यांचा परखड सवाल
- पेट्रोल – डिझेल : रुपया – रूबल दर विनिमय दराच्या नियोजनातून रशियाकडून स्वस्त तेल खरेदीची मोदी सरकारची तयारी
- खंजीर खुपसण्याची भाषा जपून वापरा!!; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा मराठा संघटनांना इशारा
- चिंतन फळता फळेना; गळती थांबता थांबेना!!; कपिल सिब्बल काँग्रेस सोडून समाजवादीच्या पाठिंब्यावर राज्यसभेच्या वाटेवर!!