ED raids On Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा टाकल्यानंतर आता ईडीने त्यांच्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा अपार्टमेंटवर छापा टाकला आहे. याशिवाय ईडीने अनिल देशमुखांशी संबंधित मुंबईतील इतर दोन ठिकाणीही छापे टाकले आहेत. अशाप्रकारे अनिल देशमुखशी संबंधित एकूण 5 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहेत. अनिल देशमुख यांच्यावरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईचा भाग म्हणून 2 तारखेच्या सुनावणीपूर्वी हे छापे टाकण्यात आले आहेत. दुसरीकडे, अशी बातमी येत आहे की, या छापाच्या दरम्यान अनिल देशमुख वरळी येथील सुखदा या त्यांच्या घरी पोहोचले आहेत. ED raids On Anil Deshmukh 5 places including Nagpur and mumbai houses
विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा टाकल्यानंतर आता ईडीने त्यांच्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा अपार्टमेंटवर छापा टाकला आहे. याशिवाय ईडीने अनिल देशमुखांशी संबंधित मुंबईतील इतर दोन ठिकाणीही छापे टाकले आहेत. अशाप्रकारे अनिल देशमुखशी संबंधित एकूण 5 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहेत. अनिल देशमुख यांच्यावरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईचा भाग म्हणून 2 तारखेच्या सुनावणीपूर्वी हे छापे टाकण्यात आले आहेत. दुसरीकडे, अशी बातमी येत आहे की, या छापाच्या दरम्यान अनिल देशमुख वरळी येथील सुखदा या त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
100 कोटी खंडणीचे प्रकरण
गृहमंत्रिपदावर असताना अनिल देशमुख यांचा मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला हे अधिकृत निवासस्थान होते. यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपुरातील सिव्हिल लाइन्समधील घरावर छापा टाकला. या छाप्यात चार मोठे अधिकारी सामील आहेत. सकाळी आठ वाजेपासून छापेमारी सुरू झाली आहे. म्हणजेच गेल्या चार तासांपासून हा छापा सुरू झाला आहे. छापेमारीदरम्यान घराबाहेर सीआरपीएफ पोलिसांची कडेकोट बंदोबस्त आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने अनिल देशमुख घरी नसल्याचे सांगितले. 100 कोटी खंडणी प्रकरणात हे छापे टाकण्यात आला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत कोठे व किती गुंतवणूक झाली, गुंतवणूक कशी झाली, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
देशमुखांच्या जवळच्या सागर नावाच्या व्यक्तीवरही छापे
याचदरम्यान अनिल देशमुखांच्या अत्यंत जवळच्या सागर नावाच्या व्यक्तीच्या नागपुरातील घरीही ईडीची छापेमारी सुरू आहे. सागर अनिल देखमुखच्या तीन डझनहून अधिक कंपन्यांमध्येही संचालक होता. सागर नावाच्या या व्यक्तीचा कोलकात्यात कोट्यवधींचा व्यवसाय असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळी आठ वाजेपासून छापे सुरू
छापेमारीदरम्यान अनिल देशमुख घरी नाहीत. थोड्या वेळापूर्वी अनिल देशमुख मुंबईच्या वरळी भागातील सुखदा अपार्टमेंटमध्ये पोहोचले. ते दुपारी 12.30 वाजता त्यांच्या सुखदा निवासस्थानी पोहोचले आहेत. देशमुखांच्या अगदी जवळचा सागर नावाच्या व्यक्तीवरही नागपुरातील ठिकाणी छापे टाकले जात आहेत. सागर हा अनिल देशमुखच्या तीन डझनहून अधिक कंपन्यांमध्ये संचालकही होता. सागरचेही कोलकाता येथे मोठे साम्राज्य आहे. सागरकडे अनिल देशमुखांची सर्व सीक्रेट्स असल्याची चर्चा आहे.
यापूर्वी डीसीपी राजू भुजबळ यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात ईडीने अलीकडेच एफआयआरचा तपशील आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे यूपी एटीएसकडे मागितली होती. महिनाभरापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. एका महिन्यातच अनिल देशमुख यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा टाकण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्समधून पोलिस अधिकाऱ्यांचा वापर करून दरमहा 100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने हा गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीने एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट अर्थात ईसीआयआर दाखल करून आपली तपासणी सुरू केली. त्याअंतर्गत आज छापा टाकण्यात आला आहे.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले- यावर बोलणार नाही, कोरोनाकडे लक्ष देणे गरजेचे
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या छाप्यांवर बोलताना म्हटले की, चुकीच्या वेळी चुकीची कामे केली जात आहेत. कोरोना काळात सर्व लक्ष कोरोनाशी लढण्याकडे असले पाहिजे. तपास प्रक्रिया सुरू आहे, म्हणून मी या संदर्भात फारसे काही बोलणार नाही.
ED raids On Anil Deshmukh 5 places including Nagpur and mumbai houses
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसने लोकशाही मूल्यांना चिरडले’, आणीबाणीत काय-काय होते बॅन? पीएम मोदींनी शेअर केली तथ्ये
- Delhi Oxygen Audit : केजरीवाल, लाज असेल तर माफी मागा; देशभर तुटवडा असताना दिल्लीत ऑक्सिजनच्या चौपट मागणीवर गौतम गंभीर आक्रमक
- Delhi Oxygen Audit : दिल्लीच्या ऑक्सिजन रिपोर्टवर संबित पात्रा म्हणाले- केजरीवाल खोटं बोलल्याने 12 राज्यांवर परिणाम झाला
- ‘सीबीआय, ईडी काय तुमच्या पार्टीचे आहेत का?’, अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया
- 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 : भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय, 10 मुद्द्यांमधून समजून घ्या आणीबाणी