• Download App
    छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ईडी'ची नऊ ठिकाणी छापेमारी!ED raids in nine places in Chhatrapati Sambhajinagar

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ईडी’ची नऊ ठिकाणी छापेमारी!

     जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण; या छापेमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

    प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी  आज छत्रपती संभाजीनगरात ‘ईडी’ची छापेमारी सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार शहरातील विविध ठिकाणी ही छापेमारी केली जात आहे. ED raids in nine places in Chhatrapati Sambhajinagar

    महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून टेंडर भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.  याचा पार्श्वभूमीवर आज सकाळीच ईडीकडून शहरातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. ईडीने शहातील जवळपास नऊ ठिकाणी छापेमारी केल्यी माहिती समोर आली आहे.

    साताऱ्यातील माहुली येथे सापडली महाराणी येसूबाईंची समाधी

    विशेष म्हणजे या प्रकरणी यापूर्वीच शहरातील सिटी चौक पोलिसात १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर ई निविदा प्रकरणात अटींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तसेच महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा या सर्वांवर आरोप आहे.

    ED raids in nine places in Chhatrapati Sambhajinagar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!