प्रतिनिधी
नागपूर : नागपूरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने आज सकाळी छापे घातले आहेत. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले आहे. नागपुरातील एका जमीन खरेदी व्यवहाराबद्दल हे छापे असल्याची माहिती मिळत आहे. या व्यवहाराबद्दल उके यांच्या विरोधात आधीच काही ब्रांच मध्ये तक्रार दाखल झाली आहे. त्याबद्दल क्राईम ब्रँचने गुन्हा दाखल करून त्यांना नोटीसही पाठवली आहे.ED raids controversial Nagpur lawyer Satish Uke’s house
सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके हे घरी असताना ईडीचे छापे सुरू आहेत. सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. सतीश उके यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते. त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्यामध्ये सतीश उके यांनी त्यांची देखील भेट घेतली आहे.
आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील पार्वतीनगरातील घरी छापेमारी सुरू केली आहे. काही अधिकारी हे उके यांच्या घरी असून काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उके यांच्याविरोधात 31 जानेवारी 2021 रोजी विनयभंगाची तक्रार दाखल झाली आहे. याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याच प्रकरणात दरम्यान संबंधित तक्रारदाराने आणखी एक गंभीर आरोप केला असून मृत महिलेची जमीन आणि घर कागदपत्रांमध्ये फेरफार करून आपल्या नावावर करून घेण्याचा उद्योगात ते सामील असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. ईडीचे अधिकारी यांच्या विरोधातल्या सर्व प्रकरणांचा तपास करत आहेत. आता उके यांच्या घरी नेमके कोणत्या गैरव्यवहाराचे कोणते पुरावे सापडतात?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ED raids controversial Nagpur lawyer Satish Uke’s house
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिकेत पोलखोल अभियान राबवून भाजप काढणार शिवसेनेचे वाभाडे
- Weather Update : राज्यात पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट, मराठवाडा-विदर्भासह उत्तर-मध्य महाराष्ट्र तापणार, IMDचा सावधगिरीचा इशारा
- Jammu Kashmir Elections : जम्मू-काश्मिरात कधी होणार निवडणुका? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिले उत्तर, वाचा सविस्तर…
- Axis-City Bank Deal : ऑक्सिस बँक भारतातील सिटी बँकेचा व्यवसाय सांभाळणार, १.६ अब्ज डॉलरमध्ये झाला करार