प्राप्तिकर विभागाची कारवाई झाल्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.ED Raid: Ajit Pawar is not hiding anything; Jayant Patil followed Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
पुणे : आज सकाळपासूनच पवारांशी संबंधित असलेल्या विविध कारखाने आणि त्या कारखान्यांच्या संचालकांच्या प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे पवारांच्या अडचणी यामुळे वाढणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्तिकर विभागाची कारवाई झाल्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जयंत पाटलांनी अजित पवारांची केली पाठराखण
जयंत पाटलांनी म्हटलं की, ‘अजित पवारांनी कोणतीही कागदपत्रे दडवली नाहीत, त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्र जाहीर करण्याचा संबंधच येत नाही. तसेच ते कधीही काहीही लपवत नाहीत’, असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.
जयंत पाटलांचा भाजपवर आरोप
भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून घेत असल्याचा आरोपही जयंत पाटलांनी केला आहे.कारण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कालच जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली. त्यानंतर लगेच आज त्या कारखान्यावर कारवाई कऱण्यात आली. जयंत पाटील म्हणाले की , “अजित पवार काहीही लपवत नाहीत, हा तर भाजपचा बदनाम करण्याचा हेतू आहे.”
ED Raid: Ajit Pawar is not hiding anything; Jayant Patil followed Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- मी आर्थिक शिस्तीचा माणूस; माझ्या बहिणींशी संबंधित मालमत्तांवर छापे ही राजकीय सूडबुद्धी; अजितदादांची संतप्त प्रतिक्रिया
- तुळजाभवानीचे मंदिर मनमोहक फुलांनी नटले पुण्यातील भाविकाची सजावट सेवा
- Navratri 2021 : उदे ग अंबे उदे ऽऽऽ ! तुळजापूर सजलं-मंदिर उघडलं ; पहा डोळे दिपवून टाकणारी दृश्य
- चीनची पाकिस्तानला भारताविरुद्ध कारवायांसाठी चिथावणी; लष्करी प्रशिक्षणापासून आधुनिक ड्रोनपर्यंत सर्व पुरवठा