वृत्तसंस्था
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सहायकावर अंमलबजावणी (ईडी) संचलनालयाने फास अधिकच आवळला आहे. स्वीय सहाय्यक संजीव पालांडे याच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने मनी लॉड्रिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.ED files chargesheet against ex-Maharashtra home minister Anil Deshmukh’s aides in alleged money laundering case
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनिल देशमुख यांनी केलेले १०० कोटींचे वसुली प्रकरण राज्यात चांगलेच गाजले आहे. या प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहखात्यातील १०० कोटीच्या वसुलीचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला होता.
हा प्रश्न विधानसभेत गाजल्यावर महाविकास आघाडी आणि गृहखात्याची अब्रू गेली होती. त्या बरोबर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावर पाणी सोडावे लागले होते.या प्रकरणात देशमुखबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि असिस्टंट कुंदन शिंदे यांचा मोठा सहभाग आहे
या दोघांवर बार मालकांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप आहे. आता मनी लॉन्ड्रीग प्रकरणी संजीव पालांडे याच्याविरुद्ध अंमलबजावणी (ईडी) संचलनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे.
ED files chargesheet against ex-Maharashtra home minister Anil Deshmukh’s aides in alleged money laundering case
महत्त्वाच्या बातम्या
- काबूलमध्ये गुरुद्वारात अडकले 260 हून अधिक शीख, सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदतीचे ‘युनायटेड शीख’चे आवाहन
- Farmer Protest : NH-24 सुरू होणार की नाही, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, यूपी सरकारकडून शपथपत्र दाखल
- अयोध्येतील राम मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गाला कल्याण सिंहांचे नाव, यूपीच्या 5 जिल्ह्यांत असेल ‘कल्याण सिंह’ मार्ग
- सप्टेंबर महिना धोक्याचा : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा निती आयोगाचा इशारा ; दररोज ४ ते ५ लाख रुग्ण वाढणार
- जर तुमच्याकडेही असेल 2 रुपयांचे ‘हे’ नाणे तर तुम्ही घरी बसून बनू शकता लखपती