वृत्तसंस्था
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक सध्या आर्थर रोड जेलच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ED Faraz Malik third somons
या पार्श्वभूमीवर मनी लॉन्ड्रिंगबद्दल पुढचे प्रश्न विचारण्यासाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याला दोनदा समन्स पाठवले आहे. परंतु त्याने काल दुसरे समन्स टाळले ईडीने चौकशीला बोलवले होते तरी तो हजर राहिला नाही. आता फराज मलिक याला तिसरे समाज पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच फराज मलिक याला समन्स पाठवून गोवावाला कंपाउंडमधील जमिनीचा व्यवहार तपासण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
– दोनदा टाळले समन्स
पहिल्या समन्सच्या वेळी फराज मलिक याने आठवडाभराची मुदत मागितली होती. ईडीने ती मंजूर केली होती. आठवड्यानंतर फराज मालिकला दुसरे समन्स पाठविण्यात आले. परंतु, दुसऱ्या समन्सच्या वेळी देखील फराज मलिक ईडीसमोर गैरहजर राहिला. त्याऐवजी त्याने आपला वकील पाठवला. परंतु, आता फराज मलिक याला तिसरे समन्स पाठवण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तिसरे समन्स पाठवून फराज मालिकची चौकशी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
– कायदेशीर कारवाई थांबणार नाही
कायदेशीर कारवाई थांबणार नाही, असा इशारा देखील अधिकाऱ्यांनी दिला आहे. नवाब मलिक आणि फराज मलिक यांनी गोवावाला कंपाऊंड मधील जमिनीचा व्यवहार दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी केला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्ये लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप आहे. त्यासंबंधीची कागदपत्रे ईडीने मुंबई हायकोर्टात सादर केल्यानंतर मुंबई हायकोर्टाने नवाब मलिक यांना ईडीच्या आरोपातून मुक्तता देण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे सध्या ते आर्थर रोड जेलच्या कोठडीत आहेत. आता त्यानंतर फराज मलिक हा देखील ईडीच्या स्कॅनर खाली आला आहे.
ED Faraz Malik third somons
महत्त्वाच्या बातम्या
- ED – IT Raids : युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपवर ईडी – इन्कम टॅक्सचे देशभर छापे, मुंबई, ठाणे, नाशकातल्या ऑफिसेसवरही तपास!!
- The Kashmir Files : सिनेमा पाहिला नाही तरी… “द काश्मीर फाईल्स”वर बंदीची खासदार बद्रुद्दिन अजमल यांची मागणी!!
- Sonia Gandhi hits at Facebook : सोनिया गांधी बऱ्याच दिवसांनी पार्लमेंटमध्ये बोलल्या, फेसबुक, सोशल मीडियावर घसरल्या!!
- Bhagwant Maan : चन्नींच्या शपथविधीला निमंत्रण नव्हते, भगवंत मान यांनी बोलावल्याबद्दल आभार, काँग्रेस खासदार मनीष तिवारींचे काँग्रेसच्या वादाच्या आगीत तेल!!