• Download App
    कोरेगाव भीमा शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांच्या चौकशीस ईडीला परवानगी|ED allows permission for interrogation of Gautam Navlakha, accused in Koregaon Bhima urban Naxalism case

    कोरेगाव भीमा शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांच्या चौकशीस ईडीला परवानगी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरेगाव भीमा व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा आणखी अडचणीत आले आहेत. दिल्लीतील न्यूजक्लिक या वृत्तसंकेतस्थळाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवलखा यांची चौकशी करण्याची परवानगी विशेष न्यायालयाने ईडीला दिली आहे.ED allows permission for interrogation of Gautam Navlakha, accused in Koregaon Bhima urban Naxalism case

    न्यूजक्लिक वृत्त संकेतस्थळाविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीला नवलखा यांचा जबाब नोंदविणार आहे. नवी दिल्ली ईओडब्ल्यूने यूजक्लिक विरोधात गुन्हा नोंदविला. या वेबसाईटसाठी परदेशातून निधी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.



    त्यानंतर ईडीने न्यूजक्लिकविरोधात गुन्हा नोंदविला आणि त्याचा तपास सुरू आहे. गेल्या वर्षी ईडीने न्यूजक्लिकच्या कार्यालयावर व प्रमोटर्सच्या नवी दिल्ली येथील राहत्या घरीही छापे टाकले.पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अंतर्गत गौतम नवलखा यांचा जबाब नोंदविण्यासाठी ईडीने गेल्याच आठवड्यात विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

    नवलखा यांना अटक करणार आहात का, असा सवाल न्यायालयाने ईडीला केला. सुरुवातीला केवळ चौकशी करणार आहोत, अशी भूमिका ईडीने घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलत न्यायालयाला सांगितले की, आवश्यकता असल्यास नवलखा यांना अटक करणार आहोत.

    याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ. दि. २४ मार्च २०२१ रोजी ईडीने या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदविणे आवश्यक आहे, अशी माहिती ईडीने न्यायालयाला दिली. त्यानंतर विशेष न्या. डी. ई. कोथळीकर यांनी ईडीचा अर्ज मंजूर केला.

    ED allows permission for interrogation of Gautam Navlakha, accused in Koregaon Bhima urban Naxalism case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!