• Download App
    नौटंकी बंद करावी, घोटाळा केल्यावर कारवाई होणारच!!; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल ED Action Sanjay Raut kirit somaiyaa

    ED Action Sanjay Raut : नौटंकी बंद करावी, घोटाळा केल्यावर कारवाई होणारच!!; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

    प्रतिनिधी

    मुंबई : संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी घोटाळा केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. आता संजय राऊत यांनी कितीही आरडाओरडा केला, नौटंकी केली तरी कारवाई थांबणार नाही. कारवाई होणारच, अशा शब्दात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. ED Action Sanjay Raut kirit somaiyaa

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितले होते की केंद्रीय तपास यंत्रणा या प्रामाणिकपणे कारवाई करत आहेत. त्यामुळे राऊत यांनी जरी 12 पानी पत्र लिहिले किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले, तरी कारवाई करण्यात येईल, असे किरीट सोमय्या म्हणाले.

    राऊतांनी 55 लाख रुपये परत केले

    संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या उद्धट सरकारला वाटत असेल की पोलिसांचा माफियासारखा वापर करून केंद्रीय तपास संस्थांमधील प्रामाणिक अधिकाऱ्याचे तोंड बंद करता येईल, परंतु, कारवाई होणार आहे. प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नीचे आर्थिक व्यवहार बाहेर आलेले आहेत. आज ईडीने कारवाई करून संजय राऊत यांची अलिबागमधील काही जमीन, संपत्ती आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे. संजय राऊत यांना आधीच लक्षात आले म्हणून त्यांनी 10 महिन्यांपूर्वी ईडी कार्यालयात जाऊन 55 लाख रुपये परत केले होते.

    बोगस पत्रव्यवहार

    ईडीची काही दिवस कारवाई सुरू होती. आमच्याकडे देखील माहिती येत होती. गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, नील आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो, पण त्यांनी असली किती नौटंकी केली तरी कायदेशीर कारवाई थांबणार नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

    ED Action Sanjay Raut kirit somaiyaa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!