• Download App
    शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना साखर कारखान्यावर ईडीची कारवाई सुरू ED action against Shiv Sena leader Arjun Khotkar's Jalna sugar factory

    ED action : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना साखर कारखान्यावर ईडीची कारवाई सुरू

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखाना एसएसके घोटाळ्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कारवाई सुरू केली आहे. संबंधित कारखान्याच्या कोणत्याही मालमत्ता विक्री अथवा हस्तांतरणास परवानगी देऊ नये असे पत्र सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी जालन्याच्या जिल्हाधिकार्‍यांना पाठवले आहे. हे पत्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे.ED action against Shiv Sena leader Arjun Khotkar’s Jalna sugar factory

    अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखाना (एसएसके) घोटाळ्यावर कारवाई सुरू. ED ने जिल्हाधिकाऱ्यांना SSK च्या कोणत्याही मालमत्तेच्या विक्री हस्तांतरणास परवानगी देऊ नये, असे ईडी ने पाठविलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

    महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन आज सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील पाचवी मंत्री आहेत की ज्यांच्यावर ईडीने कारवाई सुरू केली आहे. या आधी अनिल देशमुख नवाब मलिक यांना किडीने कोठडीत ठेवले आहे प्राजक्त तनपुरे यांची 13 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. काँग्रेस नेते अशिष देशमुख यांची मालमत्ता ही जप्त करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या घोटाळ्यांचीही चौकशी करत आहे.

    ठाकरे सरकारच्या डर्टी डझन मंत्री/नेत्यांच्या घोटाळ्यांवरील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज आणि उद्या दिल्लीत असेन, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

    ED action against Shiv Sena leader Arjun Khotkar’s Jalna sugar factory

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!