विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महानगर परिवहन मंडळातर्फे लवकरच पुणे ते सिंहगड ही ई बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही बस सेवा आठवड्यातले 8 दिवस चालू राहील. आणि ही सर्व्हिस चालू झाल्यानंतर वीकेण्डला प्रायव्हेट वाहनांना गडावर जाण्यास परवानगी नसणार आहे.
E bus service: Pune to Sinhagad E bus service will start soon
सध्या सिंहगडावर जायचे असेल तर बरेच खाजगी चारचाकी व्यावसायिक वाहने उपलब्ध आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बससेवा लवकरच चालू होईल असे जाहीर केले होते.
स्टेट फॉरेस् डिपार्टमेंटकडून ही ई बससेवा चालू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आलेले आहे. स्टेट फॉरेस् डिपार्टमेंटकडून गोळेवाडी येथे पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि ई बस सेवेअंतर्गत स्थानिक मुलांना टुरिस्ट गाईड बनण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे. जर ई बससेवा सुरू झाली तर प्रत्येक बसमध्ये एक गाइड असणार आहे.
गडावर जाण्यासाठी सध्या उपलब्ध असणारा ऑप्शन म्हणजे खासगी चारचाकी गाड्या हा आहे. त्यासाठी 120 रुपये जाण्या येण्यासाठी द्यावे लागतात. तर ई बस सेवे अंतर्गत हे किंमत 100 रुपये इतकी असेल. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड सोबत केलेल्या चर्चे नंतर पीएमपीएलने एक चार्जिंग स्टेशन गडाच्या पायथ्याशी उभे करण्या संदर्भात देखील चर्चा केली आहे.
E bus service: Pune to Sinhagad E bus service will start soon
महत्त्वाच्या बातम्या
- बंगळुरूमध्ये फेब्रुवारीत आयपीएलचा मेगा लिलाव; पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरु
- मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी आरक्षणासाठी विधान भवनावर धडक मोर्चा, प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- मोदींच्या दुबार काशी दौऱ्याचा राजकीय मुहूर्त साधत अयोध्येतील जमीन खरेदीवरून प्रियांका गांधींचा निशाणा!!
- आदित्य ठाकरेंना धमकी आली, सरकारने एसआयटीची घोषणा केली!!; विरोधकांनी दारुच्या बाटल्यांची चौकशी “काढली”!!