• Download App
    लतादीदींच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात विधिवत विसर्जन; दर्शनासाठी गर्दी । Dutiful immersion of Latadidi's bones in Ramkunda, Nashik; Crowds for darshan

    लतादीदींच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात विधिवत विसर्जन; दर्शनासाठी गर्दी

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाच्या अस्थींचे नाशिकला रामकुंडावर धार्मिक विधी करुन विसर्जन करण्यात आले. यावेळी उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आदी कुटुंबीय रामकुंडावर उपस्थित होते. पुरोहित संघाने अस्थी विसर्जनपूर्वी धार्मिक विधी केला. नाशिक शिवसेनेने अस्थी विसर्जन कार्यक्रमाचे सर्व नियोजन केले. Dutiful immersion of Latadidi’s bones in Ramkunda, Nashik; Crowds for darshan



    आठ दशकांपर्यंत देशाच्या पाच पिढ्यांमध्ये सुरांचा गोडवा निर्माण करणाऱ्या, तो गोडवा कायम ठेवणाऱ्या भारतरत्न, स्वर गानसम्राज्ञी स्वर्गीय लता दीदी या रविवारी, ६ फेब्रुवारी रोजी अनंतात विलीन झाल्या. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले होते. शासकीय इतमामात मुंबईत अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज पाचव्या दिवशी नाशिकच्या गोदावरीतील पवित्र रामकुंडात लता मंगेशकर अर्थात दीदींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. लता दीदींच्या अस्थी रामकुंड परिसरात त्यांचे कुटुंबीय घेऊन आले. विधिवत पूजा करूनही अस्थींचे विसर्जन रामकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी आदिनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मयुरेश पै, हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव कृष्ण मंगेशकर त्यांच्यासह मंगेशकर कुटुंबीय, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.

    Dutiful immersion of Latadidi’s bones in Ramkunda, Nashik; Crowds for darshan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींवरून विधानसभेत विवाद; विरोधकांचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न; सत्ताधाऱ्यांचा बहिणींच्या नादी न लागण्याचा इशारा

    Ajit Pawar : दारू दुकानासाठी आता सोसायटीची NOC बंधनकारक; अजित पवारांची विधानसभेत मोठी घोषणा

    CM Fadnavis : मुंढवा जमीन प्रकरणात कुणालाही वाचवले जाणार नाही:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले