• Download App
    मातोश्री बाहेर राष्ट्रवादीची दसरा मेळावा पोस्टर्स; पुण्यात पवार म्हणाले, शिवसेनेच्या कार्यक्रमाशी राष्ट्रवादीचा संबंध नाहीDussehra rally posters of NCP outside Matoshree

    मातोश्री बाहेर राष्ट्रवादीची दसरा मेळावा पोस्टर्स; पुण्यात पवार म्हणाले, शिवसेनेच्या कार्यक्रमाशी राष्ट्रवादीचा संबंध नाही

    प्रतिनिधी

    मुंबई/पुणे : खरी शिवसेना कोणाची?? आणि दसरा मेळावा मोठा कोणाचा?? यावरून शिवसेनेच्या ठाकरे – शिंदे गटांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर राजकीय झुंज लागलेली असताना ठाकरेंचे निवासस्थान मातोश्री बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसने दसरा मेळाव्याची पोस्टर्स लावली आहेत. पण पुण्यात मात्र शरद पवारांनी दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. त्याच्याशी राष्ट्रवादीचा काडीचाही संबंध नाही, असे वक्तव्य केले आहे. Dussehra rally posters of NCP outside Matoshree

    शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बूस्टर डोस मिळण्याची चर्चा गेले 15 दिवस तरी राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला केलेल्या मदतीच्या बदल्यात ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला काँग्रेसचा पाठिंबा अशा बातम्याही आल्या आहेत. त्यातच मातोश्री बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मोठमोठे पोस्टर्स लावून ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला पाठिंबा दिला आहे, पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्याशी राष्ट्रवादीचा कोणताही संबंध नाही असा पुण्यातल्या पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.

    शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याचबरोबर राष्ट्रवादीने दसरा मेळाव्यासाठी ताकद लावली, तर होणाऱ्या गर्दीला शिवाजी पार्कचे मैदान पुरणार नाही, असा दावाही केला आहे.

    पण एकीकडे राष्ट्रवादीची मातोश्री बाहेर दसरा मेळावा पोस्टर्स आणि दुसरीकडे शरद पवारांचा शरद पवारांचे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याशी राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही, असे वक्तव्य, अशी तळ्यात मळ्यात राजकीय भूमिका दिसली आहे.

    Dussehra rally posters of NCP outside Matoshree

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस