प्रतिनिधी
मुंबई : दसरा मेळाव्यातील भाषणांपेक्षा आता उत्सुकता आहे ती मेळाव्यात सर्वाधिक गर्दी कोण खेचणार?? ठाकरे की शिंदे??, याकडे महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत, इतकेच नाही तर देशभरात दोन्ही दसरा मेळाव्यांची उत्सुकता अक्षरशा शिगेला पोहोचली आहे!! या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी केलेला एक सर्व्हे समोर आला आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होणार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. Dussehra Melave: Who is successful in the race to draw crowds?, Thackeray or Shinde
शिंदे गट आणि ठाकरे गट यांचा उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही गटाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत खाजगी वाहने, बसेस आणि ट्रेनने दाखल होणार आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुल या ठिकाणी होणार आहे आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादर शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे. या दोन्ही गटापैकी सर्वाधिक गर्दी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी उसळणार असल्याचे मुंबई पोलिसाच्या सर्व्हेतून समोर आले आहे.
वाहनांसाठी पार्किंग
मुंबई पोलिसांचा सर्व्हे आणि शिंदे गटाची एकंदर तयारी बघून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात सर्वाधिक गर्दी होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने शिंदे गटाची वाहने पार्क करण्यासाठी २३ ठिकाणी, तर ठाकरे गटाची वाहने पार्क करण्यासाठी केवळ १२ ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. या पार्किंगच्या ठिकाणांच्या संख्येवरून दसरा मेळाव्यात शिंदे गटाचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई पोलिसांच्या सर्व्हेनुसार शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी सर्वाधिक संख्येने कार्यकर्ते मुंबईत येणार आहे, ज्या वाहनातून दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणि पुढारी मुंबईत दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत, त्या वाहनांच्या पार्किंगसाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी पार्किंग व्यवस्था केली आहे.
या वाहतूक व्यवस्थेवरूनच पोलिसांनी दसरा मेळाव्यात शिंदे गटाचा वरचष्मा राहणार असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
Dussehra Melave: Who is successful in the race to draw crowds?, Thackeray or Shinde
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत होणार्या हलाल परिषदेविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची 9 ऑक्टोबरला हलाल सक्तीविरोधी परिषद!!
- निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय : एक टक्क्यापेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द
- दसरा मेळावात गर्दीसाठी मुंबईतील प्रत्येक शाखेतून 4 बस; शाखाप्रमुखांना उद्धव ठाकरेंचे टार्गेट!!
- पवारांच्याच हस्ते महर्षी पुरस्कार स्वीकारताना सुशीलकुमारांनी काढली वसंतदादांचे सरकार पवारांनी पाडल्याची आठवण