विशेष प्रतिनिधी
मुंबई : सोमवारी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर १२७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे सर्व आरोप तात्काळ फेटाळून लावले होते.Due to sudden health issues minister hasan mushrif has been admitted to bombay hospital in mumbai
किरीट सोमय्या यांनी सर्व पुराव्यांसहित ईडी मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी लगेचंच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आपली बाजू स्पष्ट केली होती. ‘सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी सुमारे वीस मिनिटं हसन मुश्रीफ आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांच्या माहितीवरून कळते.
या दोघांच्या चर्चेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील पवारांशी चर्चा केल्याचे दिसून येते. अनिल देशमुख यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांना भाजपकडून टार्गेट केल्याची चर्चा सर्वत्र असल्याने शरद पवार देखील आता चिंतेत आले आहेत.
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार हसन मुश्रीफ यांच्या ताब्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मनी लॉण्डरिंग आणि बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या संशयास्पद व्यवहाराची सखोल चौकशी केली जावी म्हणून किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहेत.
किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार आपण निर्दोष असल्याचे कोणतेही पुरावे हसन मुश्रीफ यांच्याकडे नाहीयेत. असे खुलेआम आरोप देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत.
या सर्व प्रकरणानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईमधील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणि त्यांच्यावर उपचार देखील तातडीने सुरू करण्यात आले आहेत. त्यांना ताप आल्याने त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे होते अशी माहिती भैया माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
Due to sudden health issues minister hasan mushrif has been admitted to bombay hospital in mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : वाघ, बिबट्या कातडीची पुणे जिल्ह्यात तस्करी वाघ आणि बिबट्याचे जगणे शिकाऱ्यामुळे अवघड
- गुजरातेत भाजपने मुख्यमंत्र्यांसकट अख्खे मंत्रिमंडळ बिनबोभाट बदलले; पंजाबमध्ये काँग्रेस श्रेष्ठी बंडाळीच्या रस्त्यावर घसरले…!!
- Kabul Drone Attack : पेंटागॉनने चूक कबूल केली, माफी मागत म्हटले, दहशतवाद्यांऐवजी 10 अफगाण नागरिकांचा जीव गेला
- मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी, रेल्वेत गॅस अटॅक आणि प्रवाशांवर हल्ला करू शकतात अतिरेकी
- पंजाब काँग्रेसमध्ये बंडाळी : 40 आमदारांनी कॅप्टनविरोधात शड्डू ठोकले, आज विधिमंडळ गटाची बैठक, अविश्वास प्रस्ताव येणार?