वृत्तसंस्था
सांगली : कोयना धरणातून विसर्ग वाढवल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात धाकधूक पुन्हा वाढाली आहे. Due to rising discharge from Koyna dam Sangli area will be Danger zone Again
आमणापूर पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. आधीच महापुराने वेढलेल्या सांगलीला अजून पूर्णत: दिलासा मिळालेला नाही. मात्र, पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
कोयना धरणाचा विसर्ग गुरुवारपासून 50 हजार क्यूसेकने वाढवला. त्यामुळे सांगलीतील पलुस तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये धाकधूक आहे. शुक्रवारपासून नदीच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ होत आहे. आमणापूर येथे पाणी पातळीत रात्रीत दीड फुटाची वाढ झाली आहे.
पाणी पातळीत झाली वाढ
भिलवडीतील पाणी पातळीत दिवसभरात एका फुटाने वाढ होऊन सायंकाळी ७ वाजता ३८.५ इंचावर पोचली आहे. तर आमणापूर अंकलखोप पुलावर शनिवारी पहाटे सहापासून पाणी येण्यास सुरुवात झाली. यामुळे पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पुलावर दुसऱ्यांदा पाणी आले आहे. नागठाणे बंधारा हा गेल्या ९ दिवसांपासून पाण्याखाली आहे. त्यातच शुक्रवारपासून तालुक्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे.
पूरग्रस्तांसाठी लवकरच पॅकेज
महापुरामुळे शेतीचे मनुकसान झाले. शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज शेतकऱ्यांना देऊ असे आश्वासन मंत्री विश्वजित कदम यांनी दिले. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे फटका बसला आहे. कोल्हापूरसह सांगलीची जनताही मदतीच्या अपेक्षेत आहेत. कोल्हापूरला मुख्यमंत्री आले. पण सांगलीला आले नाहीत. यावर मंत्री विश्वजित कदम म्हणाले, मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागाची पाहणीसाठी येतील.
Due to rising discharge from Koyna dam Sangli area will be Danger zone Again
महत्त्वाच्या बातम्या
- Covid-19 Vaccine : काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी अखेर घेतली कोरोनाची लस, पहिला डोस घेतल्यामुळे राहुल गांधी दोन दिवसांपासून संसदेत गैरहजर
- देशात तिसरी लाट केरळमधून येण्याची भीती, कोरोना रुग्णसंख्या वाढतेय ; ईशान्य भारतात परिस्थिती बिकट
- Tokyo Olympics : अतनु दासपाठोपाठ बॉक्सर अमित पंघालही बाहेर ; कमलप्रीत कौर फायनलमध्ये
- बॉक्सर पूजा वडिलांना केला फोन म्हणाली ,”पप्पा तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.”
- तामिळनाडू महिला आयपीएस बलात्कार प्रकरणात डीजीपी त्रिपाठी यांच्याविरुद्ध 400 पानांचे आरोपपत्र दाखल..