मराठा आरक्षण नसल्यानं एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडलीये.Due to rain, there are no losses, Maratha reservation, ‘No-reservation does not have a lot of surprise’, no more than the reservation of life ‘
विशेष प्रतिनिधी
जालना : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी सर्व मराठा बांधवांनी संपूर्ण राज्यभर मोठ्या संख्येने आंदोलन केली होती.
आत्तापर्यंत बर्याच मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. अशीच एक घटना जालन्यात घडली आहे. मराठा आरक्षण नसल्यानं एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडलीये.
आत्महत्या केलेल्या तरूणाच नाव सदाशिव शिवाजी भुंबर असं आहे. तो 22 वर्षांचा होता.’आरक्षण नसल्याने जीवनयात्रा संपवतोय’, अशी सुसाईड नोट लिहून त्याने आपल्या आयुष्य संपवल.
सदाशिव हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. त्याने इलेक्ट्रीशियनचा कोर्स केला होता.मात्र मराठा आरक्षण नसल्यानं त्याला चांगल्या पगाराची आणि हवी तशी नोकरी मिळत नव्हती.असं त्यान सुसाईड नोटमध्ये लिहिल होत.तसेच शेतात ओला दुष्काळही आहे आणि या कारणावरून घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन मंगळवारी रात्री त्याने जीवनयात्रा संपवली.
आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आपले प्राण दिले आहेत. महिना-दोन महिन्यांनी अशी बातमी राज्यातून येतीय. त्यापेक्षा एकदाच आरक्षणाचा निकाल लावून टाका, अशी मागणी येणोरा गावातील मराठा तरुणांनी केलीय.
Due to rain, there are no losses, Maratha reservation, ‘No-reservation does not have a lot of surprise’, no more than the reservation of life ‘
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना : रशियाची स्पुतनिक लाइट भारतात चाचणीसाठी मंजूर, एकाच डोसमध्ये केले जाईल काम
- राहुल गांधींची पुन्हा सावरकरांवर टीका; गांधी आणि गोडसे – सावरकरांच्या विचारधारेत भेद
- मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान; जान मोहम्मदचे दाऊद गँगशी २० वर्षांपासून संबंध; एटीएसचा खुलासा!
- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित, आरोपींनी केले आरोप अमान्य