विशेष प्रतिनिधी
बीड : बीड आगारातील एका बसचालकाने वेळेवर पगार झाला नाही म्हणून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी आर्थिक संकटाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. Due to non-payment of salary on time ST Bus driver commits suicide in Beed city
तुकाराम सानप, असे त्या चालकाचे नाव आहे.त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी आणि बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी दिली.
सोमवारी दिवसभर बसच्या फेऱ्या त्यांनी केल्या होत्या. घरी गेल्यानंतर त्यांनी बीड शहरातील अंकुश नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नियमानुसार पगार ७ तारखेपर्यंत होत असतो.परंतु अजूनही पगार झालेला नाही, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
तुकाराम सानप यांच्या घरची लाईट गेल्या १५ दिवसांपूर्वी कट केली होती. घरातील किराणा संपला होता. यासह इतर कारणांमुळे तुकाराम सानप यांनी आत्महत्या केली. काम करुन सुद्धा वेळेवर पगार मिळत नसतील तर संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा,अशी मागणी कर्मचारी करत आहेत.
- वेळेवर पगार न झाल्याने बसचालकाची आत्महत्या
- आर्थिक संकटामुळे राहत्या घरी गळफास घेतला
- पंधरा दिवसांपूर्वी घराचे तोडले वीज कनेक्शन
- घरातील किराणा सुद्धा होता संपला
- मंत्री, अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी
Due to non-payment of salary on time ST Bus driver commits suicide in Beed city
महत्त्वाच्या बातम्या
- मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा, दिल्ली-एनसीआर, यूपी, जम्मू आणि काश्मीरमधील 18 ठिकाणी NIAचे एकाच वेळी छापे
- जम्मू-काश्मिरात २४ तासांमध्ये ३ चकमकींत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, खोऱ्यात लष्कराच्या
- कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वेने कंबर कसली; वीजनिर्मिती केंद्रावर रोज ५०० रेक पोचविणार
- इंधनाच्या दरवाढीतून देशात जनतेला मोफत लस; केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांचे स्पष्टीकरण
- पुणे विभागातील पर्यटक निवासांसाठी एमटीडीसीने केल्या विविध सवलती जाहीर