• Download App
    पुण्यात उष्माघाताने १५ मोरांचा मृत्यू खेड ताालुक्यातील लोेणकरवाडी येथील घटना Due to High temperature १५ peacock dead in pune district khed region lonkarwardi

    पुण्यात उष्माघाताने १५ मोरांचा मृत्यू खेड ताालुक्यातील लोेणकरवाडी येथील घटना

    पुणे जिल्ह्यात एकेकाळी उन्हाळा असह्य होत नव्हता. मात्र, मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्याने मानवाबरोबर पशुपक्ष्यांनाही याची झळ बसत आहे. असाच प्रकार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोणकरवाडी येथे उघडकीस आला आहे. जवळपास १५ मोरांचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – हवामान बदलामुळे वातावरणात मोठे बदल झाले आहेत. या बदलामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात एकेकाळी उन्हाळा असह्य होत नव्हता. मात्र, मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्याने मानवाबरोबर पशुपक्ष्यांनाही याची झळ बसत आहे. असाच प्रकार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोणकरवाडी येथे उघडकीस आला आहे. जवळपास १५ मोरांचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पक्षी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. Due to High temperature १५ peacock dead in pune district khed region lonkarwardi

    तालूक्याच्या पुर्व भागातील दावडी परिसरातील लोणकरवाडी येथे मोरांचा मुत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. उन्हाचा वाढता तडाखा अथवा काहीतरी खाण्यात आल्याने झालेली विषबाधा हे कारण त्यामागे असू शकते असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. दावडी परिसरातीलील डोंगररांगात मोठ्या प्रमाणात मोरांचा अधिवास आहे. रविवारी सकाळी काही मोर तडफडत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले. दावडीचे पोलिस पाटील आत्माराम डुंबरे, संतोष लोणकर व ग्रामस्थांनी धाव घेतली. काही मोरांचा आधीच मूत्यू झाला होता. तडफडणाऱ्या ४ मोरांना पाणी पाजुन जीवदान दिले. खेड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौधळ, वनपरिमंडळ अधिकारी दत्तात्रय फाफाळे, वनरक्षक सुषमा चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन मुत्युमुखी पडलेल्या मोरांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालानंतर मोरांच्या मुत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

    Due to High temperature १५ peacock dead in pune district khed region lonkarwardi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!