वृत्तसंस्था
मुंबई : क्रिकेट सामन्यापूर्वी अनेकदा मला झोपच यायची नाही. एक दोन नव्हे तर तब्बल 12 वर्षे माझ्या झोपेचे खोबरे झाल्याचा खुलासा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केला.Due to Cricket match worry I am not able to sleep many times in Night : Sachin Tendulkar
एखादा माणूस आपल्या ध्येयावर आणि कार्यावर किती लक्ष ठेवून असतो. त्याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड नावावर केले आहेत.
आजही तो तरुणांचा आदर्श आहे. २४ वर्षाच्या कारकिर्दीतील काही वर्षे त्याने चिंतेत घालविली असल्याचा खुलासा त्याने केला. मात्र ही चिंता एक तयारीचा भाग आहे याची नंतर जाणीव झाल्याचंही त्याने सांगितलं आहे.
“खेळासाठी शारिरीक तयारीसोबतच मानसिक तयारीदेखील महत्वाची असते. मैदानात उतरण्याआधीच माझ्या डोक्यात फार आधी मॅच सुरु झालेली असायची. चिंताग्रस्त होण्याचं प्रमाण खूप होतं,”
असा खुलासा सचिनने अनअकॅडमीकडून आयोजित चर्चेदरम्यान केला.“मी जवळपास १० ते १२ वर्ष चिंताग्रस्ततेचा सामना केला. अनेक सामन्यांआधी मला झोप लागली नाही. पण यानंतर हा तयारीचा भाग असल्याचं मी मान्य केलं.
मनाला शांती मिळावी यासाठी काही गोष्टी करण्यास सुरुवात केली,” असं सचिन सांगतो. त्या काही गोष्टींमध्ये शॅडो बॅटिंग, टीव्ही पाहणे, व्हिडीओ गेम खेळणे यांचा समावेश होता. सकाळचा चहा करणं देखील मला खेळासाठी तयार होण्यात मदत करत होतं”.
“चहा करणे, कपडे इस्त्री करणे मला खेळाच्या तयारीत मदत करत होते. मी सामन्याच्या एक दिवस आधी बॅग पॅक करत असे. माझ्या भावाने मला हे शिकवलं होतं, नंतर तो सवयीचा भाग झाला.
शेवटच्या सामन्यातही मी ही शिस्त पाळली होती,” असं सचिन सांगतो. २०१३ मध्ये २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सचिनने निवृत्ती घेतली.
Due to Cricket match worry I am not able to sleep many times in Night : Sachin Tendulkar
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोरोनावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रस्ताव, डॉक्टरांच्या मदतीसाठी तयार होईल मनुष्यबळ
- DRDOने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2DG लॉन्च; रिकव्हरी होणार फास्ट, ऑक्सिजनची गरजही कमी
- Narada Sting Case : ममतांचे मंत्री फिरहाद हकीम, सुब्रतो मुखर्जींना सीबीआयने घेतले ताब्यात, नारदा घोटाळ्याप्रकरणी चौकशी
- WHOचा इशारा : उशिरापर्यंत काम करण्याची सवय प्राणघातक, Long Working Hours मुळे हृदयविकारांत वाढ
- Free Import : डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय, 3 प्रकारच्या डाळी आयातीला परवानगी