• Download App
    दुष्काळी मराठवाड्यात सरासरीच्या १५० टक्के पाऊस, अतिवृष्टीने २२५४ कोटींचे नुकसान|Droughtproned Marathwada receives 150% more of average rainfall, loss of Rs 2254 crore due to excess rainfall

    दुष्काळी मराठवाड्यात सरासरीच्या १५० टक्के पाऊस, अतिवृष्टीने २२५४ कोटींचे नुकसान

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद: दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सरासरीच्या तब्बल 150 टक्के जादा पाऊस झाला आहे. अतिवृष्टीने मराठवाड्यात २५ लाख ९८ हजार २१३ हेक्टरचे नुकसान झाले आहे. .महसूल प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालात सुमारे २२५४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.Droughtproned Marathwada receives 150% more of average rainfall, loss of Rs 2254 crore due to excess rainfall

    पहिल्या टप्प्यातील अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.शेतकऱ्यांना भरपाईपोटी१७९६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. मराठवाड्यात ३० सप्टेंबरअखेरपर्यंत १०२० मिमी म्हणजे अपेक्षित सरासरीच्या १५० टक्के पाऊस झाला आहे.



    सततच्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे. फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी पंधरा ते वीस लाख हेक्टरचे नुकसान झाले, असे दिसत होते. सध्या हा आकडा २५ लाखांवर गेला असून तो पुढील चार-पाच दिवसांत तीस लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज महसूल विभागाच्या अहवालात आहे.

    Droughtproned Marathwada receives 150% more of average rainfall, loss of Rs 2254 crore due to excess rainfall

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!