दोन महिन्यांपूर्वी डॉ.शिरीष गोडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा देत असल्याचे पत्र पाठवले होते.Dr. Shirish Gode resigns, joins Congress; Big shockto BJP in Wardha district
विशेष प्रतिनिधी
वर्धा : वर्धा जिल्हा अध्यक्ष डॉ.शिरीष गोडे यांनी आज भाजपला राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी डॉ.शिरीष गोडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा देत असल्याचे पत्र पाठवले होते.दरम्यान गोडे यांनी अखेर राजीनामा दिला.
चंद्रकांत पाटील यांनी खासदार रामदास तडस यांच्या मार्फत गोडेंची राजीनामा देऊ नका याबाबत समजूत काढली होती. मात्र भाजपमध्ये घुसमट होत असल्याची भावना गोडेंनी व्यक्त केली.
डॉ.शिरीष गोडे दोन वर्षांपासून अध्यक्ष होते. त्या पूर्वी २०१४ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. काँग्रेसचे खासदार राहिलेल्या संतोषराव गोडे यांचे डॉ.शिरीष गोडे चिरंजीव आहेत. डॉ गोडे यांनी आरोग्य खात्यात वरिष्ठ पद भूषवून राजीनामा देत काँग्रेसचे राजकारण सुरू केले होते. मात्र संधी न मिळाल्याने त्यांनी बसपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.
पुढे भाजपामध्ये प्रवेश केल्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी खेडोपाडी भाजपा मजबूत करण्याचे कार्य केले. संघनिष्ठ भाजपा नेतेही पक्ष चालवावा तो गोडेनीच, अशी प्रशस्ती देत. त्यांच्या निर्णयास एकही नेता विरोध करीत नसे. तर पटोले म्हणाले की, गोडे यांचा सर्व तो सन्मान राखून त्यांना जबाबदारी दिली जाईल.
Dr. Shirish Gode resigns, joins Congress; Big shock to BJP in Wardha district
महत्त्वाच्या बातम्या
- आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पीएम मोदींनी रांचीत केले संग्रहालयाचे उद्घाटन, म्हणाले- त्यांचा प्रकाश पुढील पिढ्यांपर्यंत नेणे आपले कर्तव्य!
- तमिळनाडूपाठोपाठ आता केरळमध्ये पावसाची धोक्याची घंटा
- पूर्वांचलला डास आणि माफियापासून मुक्त केले, अमित शहा यांची अखिलेशवर सडकून टीका
- अरुणाचलमधील संबंधित खेडे चिनच्याच हद्दीतील, पेंटॅगॉनच्या अहवालाबाबतचा संशय दूर