• Download App
    रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा , आरोग्यमंत्री टोपे यांचे कंपन्यांना आवाहन ; ‘एमआरपी’ ही कमी करण्याचा सल्ला | Double production of Remedesivir injection, Health Minister Tope appeals to companies; Advice to reduce ‘MRP’

    रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा , आरोग्यमंत्री टोपे यांचे कंपन्यांना आवाहन ; ‘एमआरपी’ ही कमी करण्याचा सल्ला

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा आणि ‘एमआरपी’ ही कमी करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 7 कंपन्यांना केले. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवडा असून त्याचा काळाबाजार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी या  इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. Double production of Remedesivir injection, Health Minister Tope appeals to companies; Advice to reduce ‘MRP’

    आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची गरज भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करावे.



    नविन उत्पादन यायला किमान २० दिवस लागतील. त्यानंतर त्याचा तुटवडा जाणवणार नाही. काही कंपन्यांनी आयातीसाठी ठेवलेला साठा महाराष्ट्राला देण्याचे मान्य केले. मात्र पुढील काही दिवस इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे.

    प्रमुख उत्पादक कंपन्यांनी इंजेक्शनचा पुरवठा थेट शासकीय रुग्णालयांना करावा. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याचा पुरवठा केल्यास त्यांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांना पुरवठा करण्यात येईल, अशी यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यामुळे काळाबाजार रोखण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    इंजेक्शनवरी एमआरपी कमी करा

    इंजेक्शनवरी एमआरपी कमी कराव्यात अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली. राज्यात कुठेही ११०० ते १४०० रुपये या किमतीत रेमडेसीवीर मिळाले पाहिजे, असे सांगतानाच डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या कंपन्यांशी चर्चा करून इंजेक्शनची किंमत निश्चित करील, असे टोपे यांनी सांगितले.

    Double production of Remedesivir injection, Health Minister Tope appeals to companies; Advice to reduce ‘MRP’


    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!