2019 च्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या संपत्ती विवरणातून आकडा जाहीर
प्रतिनिधी
मुंबई : आपण कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. या पृथ्वीतलावर आपल्या नावावर घर नाही. त्यामुळे आपल्याला ईडी चौकशीची भीती वाटत नाही, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावावर सांगलीत सुमारे 3 कोटी रुपयांचा बंगला आहे. ही माहिती ईडी, सीबीआय किंवा अन्य कुठल्याही तपासणी यंत्रणांनी बाहेर काढली नसून दस्तूरखुद्द जयंत पाटील यांच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील संपत्ती विवरण प्रतिज्ञापत्रातच त्यांनी स्वतः दिली आहे. Don’t have house on the earth, claimed jayant patil, but holds 3 cr. benglow property in sangli
सांगलीच्या यशवंत कॉपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी सर्वे नंबर 93550, 1351 आणि 1352 या जागेवर जयंत पाटलांचा बंगला आहे आणि त्याची किंमत त्यांनीच प्रतिज्ञापत्र नमूद केल्यानुसार 2,94,65,788 रूपये एवढी आहे. या बंगल्याचे मालक ते स्वतः आहेत, असेच त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
याखेरीज जयंत पाटलांच्या नावे करोगाव मध्ये शेत जमीन असून तिची किंमत त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार 42,03,563 रूपये एवढी आहे, तसेच जयंत पाटलांच्या नावे कासेगांव मध्ये अकृषी जमीन असून तिची किंमत 84,66,022 रूपये एवढी आहे, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. जयंत पाटलांच्या एकूण अचल संपत्तीचा आकडा त्यांनीच नमूद केल्यानुसार
4,22,35,373 अर्थात 4 + कोटी रूपये एवढा आहे.
तसेच जयंत पाटलांच्या एकूण चल संपत्तीचा आकडा 12,01,61,550 अर्थात 12 + कोटी रूपये असून जीवनसाथी अर्थात पत्नीच्या संपत्तीचा आकडा 71,21,781 अर्थात 71 + लाख रूपये आहे.
Don’t have house on the earth, claimed jayant patil, but holds 3 cr. benglow property in sangli
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानच्या कोळसा खाणीत हद्दवाढीवरून वाद विकोपाला, रक्तरंजित संघर्षात तब्बल 16 जणांचा मृत्यू
- प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला, जास्त खुश होऊ नका, 2013 मध्ये विजयी होऊनही 2014 मध्ये पराभूत झाला होता
- देशात ‘स्टार्टअप्स’नी ओलांडला एक लाखाचा टप्पा; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं मोठं विधान, म्हणाले…
- काँग्रेसच्या निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कर्नाटकला येणार तब्बल ६२ हजार कोटींचा वार्षिक खर्च!