प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सुनावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून काही शिकू नका, जे महाराजांनी सांगितले, शिकवले, त्या गोष्टी करू नका, फक्त नको ते वाद करत बसायचे, माहिती नसेल, वाचन नसेल तर तज्ज्ञांकडून माहिती करून घ्या, अशा स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी वाद घालणाऱ्या नेत्यांना ठणकावले आहे. Don’t argue about Chhatrapati Shivaji Maharaj
काय म्हणाले राज ठाकरे?
कोकण दौऱ्यावर असताना राज ठाकरे म्हणाले, मनसेसाठी कोकणात सकारात्मक वातावरण वाटत आहे. त्यामुळे कोकणात दोन सभा घेणार आहे असे सांगत कोकणात विनाशकारी प्रकल्प नको, परंतु महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जाणार असतील, तर तेही अयोग्य आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
कोणीही उठून इतिहासावर बोलणे योग्य नाही. ज्यांना चित्रपटाबाबत आक्षेप असतील त्यांनी जे सिनेमा करतात त्यांच्याशी बोलावे, इतिहास हा रूक्ष आहे, तो सिनेमात रंजक करुन दाखवला तरच लोक पाहतात, असे राज ठाकरे यांनी सिनेमा वादावर भाष्य केले.
Don’t argue about Chhatrapati Shivaji Maharaj
महत्वाच्या बातम्या