• Download App
    केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावाचा वापर करून अनेकांना लाखोंचा गंडा; आरोपींना कर्नाटकातून अटक । Dombivali Couple arrested For Misusing union minister Gadkari Name in Financial Fraud From Karnataka

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावाचा वापर करून अनेकांना लाखोंचा गंडा; आरोपींना कर्नाटकातून अटक

    Financial Fraud : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करून अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका जोडप्याला डोंबिवली पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी एक जोडपे आणि त्यांच्या मुलासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. Dombivali Couple arrested For Misusing union minister Gadkari Name in Financial Fraud From Karnataka


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करून अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका जोडप्याला डोंबिवली पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी एक जोडपे आणि त्यांच्या मुलासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, या जोडप्याने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या नावाचा वापर करून लोकांना आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. आरोपी लोकांना आपण मंत्र्यांचा भाऊ असल्याचे भासवत होते आणि सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत होते. याशिवाय स्वस्त किमतीत सोन्याचे दागिने मिळवून देतो असे सांगूनही त्यांनी लोकांकडून पैसे लाटले. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना कर्नाटकातून अटक केली.

    राजन गडकरी आणि त्यांचा मुलगा आनंद गडकरी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी दाखवलेल्या अमिषानंतर लोकांना नोकऱ्याही मिळाल्या नाहीत आणि सोन्याचे दागिनेही मिळाले नाहीत. यानंतर लोकांनी गडकरी कुटुंबीयांना आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. जनतेचा दबाव आणि संताप पाहून राजन, त्याची पत्नी, मुलगा आनंद आणि आनंदचा चार वर्षांचा मुलगा त्यांचे डोंबिवलीतील घर सोडून पळून गेले. यानंतर आनंदची पत्नी गीतांजलीने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

    पोलिसांनी सांगितले की, गीतांजलीने माहिती दिली की तिचे खाते तिचा पती आणि सासऱ्याने अवैध व्यवहारासाठी वापरले होते. पोलिसांनी फसवणूक झालेल्या पीडितांपैकी अमोल पळसमकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. गीतांजली या प्रकरणात साक्षीदार झाली आहे. तिने दावा केला आहे की, तिच्या कुटुंबाकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत तिला कोणतीही माहिती नव्हती.

    गीतांजलीने पोलिसांना विनंती केली की, त्यांनी तिच्या 4 वर्षांच्या मुलाचा शोध घ्यावा. या फसवणुकीत सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विष्णूनगर पोलिसांनी दोन पथके तयार केली. आता पोलिसांनी आरोपींना कर्नाटकातून बेड्या ठोकल्या आहेत.

    Dombivali Couple arrested For Misusing union minister Gadkari Name in Financial Fraud From Karnataka

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar : बिहारच्या बेतिया पोलिस लाईनमध्ये कॉन्स्टेबलने सहकारी सैनिकावर ११ गोळ्या झाडल्या

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!