पुढचे ५० वर्षे देशात भाजपचीच सत्ता राहणार आहेत.तसेच यापुढेही भारतातील जनता मोदींना मते देतील, असा दावा पाटलांनी केला होता.Does being 50 years mean we have to end democracy? – Nawab Malik
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (१६ डिसेंबर) रोजी पुढचे ५० वर्षे देशात भाजपचीच सत्ता राहणार आहेत.तसेच यापुढेही भारतातील जनता मोदींना मते देतील, असा दावा केला होता. याला प्रतिउत्तर देताना नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की , मोदींना लोकं निवडून देतात हा दावा म्हणजे या देशातील लोकशाही संपवायची आहे का?
पुढे मलिक म्हणाले की , या देशात हिटलरसारखी परिस्थिती निर्माण करुन सगळे नियम, घटना बदलून स्वतःकडे सर्व अधिकार घ्यायचे आहे का? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.नवाब मलिक स्पष्ट भूमिका मांडत पुढे म्हणाले की , पाच राज्यात निवडणूका होणार असून या निवडणूकांच्या माध्यमातून भाजपची शक्ती किती राहिली आन किती लोकं भाजपला पसंती देतात हे स्पष्ट होईल.