सध्या वर्षभर आनंदात रहा त्यानंतर मात्र आम्हीच…भेटू!! असंही म्हणाले आहेत.
प्रतिनिधी
पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. या निकालामुळे महाविकास आघाडीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे. २८ वर्षानंतर भाजपाचा कसबा मतदारसंघात पराभव झाला आहे.
या निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपावर निशाणा साधला जात आहे. तर त्यांच्या टीकेला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. Do not forget that the opposition wins in kasaba only in the byelections Ashish Shelar warning to the opponents
Kasba By-Election Result : पुण्यातील कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी
‘’महाराष्ट्रातील आजचे निकाल म्हणजे एक भाजप विरुद्ध सगळे! त्यामुळे एका वाक्यात सांगतो “फिफ्टी-फिफ्टी!” इतिहास असे सांगतो, कसब्यात विरोधकांचा फक्त पोटनिवडणूकीतच विजय होतो हे विसरु नका. सध्या वर्षभर आनंदात रहा त्यानंतर मात्र आम्हीच…भेटू!!’’ असं आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, त्यांची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. रविंद्र धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मतं मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळवता आली.
भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी टिळक कुटुंबातूनच उमेदवार दिला जावा, अशीदेखील मागणी करण्यात आली होती. मात्र भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात होते.
Do not forget that the opposition wins in kasaba only in the byelections Ashish Shelar warning to the opponents
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस आमदार सफिया जुबेर म्हणाल्या- आम्ही राम-कृष्णाचे वंशज : अमीन खान म्हणाले – भारत धर्मनिरपेक्ष मानले जात नाही, हिंदू राष्ट्रातही कोणी मारणार नाही
- केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींचे भाषण: म्हणाले- जिथे लोकशाही नाही, असे जग निर्माण होताना पाहू शकत नाही
- पाच वर्षांत ४७ वेळा पंतप्रधान मोदींचा ईशान्येस दौरा; आठ पैकी सहा राज्यांमध्ये भाजपाचे सरकार!